VIDEO : मुंबईत तुफान पाऊस, अंधेरी सबवेमध्ये ३ फुटांपर्यंत पाणी; वाहतुकीसाठी बंद

Andheri subway closed today : मुंबईत तुफान पाऊस कोसळत आहे. त्यामुळं ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. अंधेरी सबवेत पाणी साचलं असून, वाहतुकीसाठी बंद करण्यात आलं आहे.

संजय गडदे | साम टीव्ही

मुंबईसह उपनगरांमध्ये काही वेळापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळं सखल भागांत पाणी साचलं आहे. उपनगरातील अंधेरी, गोरेगाव, जोगेश्वरी, कांदिवली- बोरिवली आदी परिसरांत मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले आहे. अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा अंधेरी सबवे देखील पाण्याखाली गेला आहे. तीन ते चार फुटांपर्यंत पाणी साचलं आहे. दिवसभरात दुसऱ्यांदा या सबवेमध्ये पाणी साचलं आहे. त्यामुळं सबवे नागरिकांना आणि वाहनांना ये-जा करण्यासाठी बंद करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com