Amravati Lok Sabha Voting: अमरावती जिल्ह्यातील 6 गावांचा मतदानावर बहिष्कार! नेमकं कारण काय?

Amravati Lok Sabha Voting News Today: अमरावतीमधील रंगबेली, कुंड, धोकडा, खामदा-किन्हीखेडा, आणि खोपमार या गावांनी लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकलाय.

Amravati Lok Sabha Voting News LIVE: अमरावती जिल्ह्यातील मेळघाट मधील पाच गावकऱ्यांनी लोकसभेच्या निवडनूकीवर बहिष्कार टाकला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष पूर्ण झाली, असं असताना आम्हाला कोणत्याही मूलभूत सुविधा मिळाला नसल्याचा आरोप या गावातल्या लोकांनी केलाय. अमरावतीमधील रंगबेली, कुंड, धोकडा, खामदा-किन्हीखेडा, आणि खोपमार या गावांनी लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकलाय. गेल्या 77 वर्षांपासून आम्ही मुलभुत सुविधांपासून वंचित असून आम्ही निवडून दिलेले एक ही प्रतिनिधी आमच्या समस्यांचं निराकरण करण्यास तत्पर दिसत नाही, असं म्हणत गावातल्या लोकांना नाराजी व्यक्त केलीय. पिण्याचे पाणी, वीज, पक्के रस्ते यासारख्या एकही सुविधा आम्हाला मिळाल्या नसून प्रत्येक लोकप्रतिनिधीकडे आम्ही मागणी केली, पण तोडगा निघाला नाही, असंही या गावातल्या लोकांनी म्हटलंय. जोपर्यंत आमच्या समस्या निकाली निघत नाही, तोपर्यंत आम्ही मतदान करणार नसल्याची भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com