जिथून निवडून आले तिथे जनतेसाठी काम करा; पुढील 30 वर्ष...; अमित शाह यांची भविष्यवाणी, राहुल गांधींनाही दिला सल्ला|VIDEO

Amit Shah Advises Rahul Gandhi To Work For People: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत पुढील ३० वर्षे तुमचा नंबर येणार नाही, असा टोला लगावला. जिथून निवडून आला आहात, तिथे जनतेसाठी काम करा, असा सल्लाही शाह यांनी दिला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत जोरदार टीका केली आहे. मला माहीत आहे, तुम्ही माझं ऐकू शकत नाही. तुम्ही परदेशात कुठेतरी बसला आहात. तिथे कशासाठी जाऊन बसला आहात, हे तुमचं वैयक्तिक आयुष्य आहे. मात्र, एकदा दिल्लीत उतरलात की माझं ऐका, पुढील ३० वर्षांपर्यंत तुमचा नंबर येणार नाही, असा टोला अमित शाह यांनी राहुल गांधी यांना लगावला. दिल्ली जल बोर्डाच्या ८ हजार ९४१ कोटी रुपयांच्या ४३ प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना शाह यांनी विरोधी पक्षांवर टीका केली. भाजपचा सामान्य बूथ कार्यकर्ता ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत कोट्यवधी कार्यकर्ते जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होऊन काम करतात. केवळ आंदोलनं आणि धरणे देऊन काहीही होत नाही, असं शाह म्हणाले. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांना जनतेसाठी काम करण्याचा सल्लाही दिला. जिथून निवडून आला आहात, तिथे जनतेसाठी काम करा, असं म्हणत अमित शाह यांनी राहुल गांधींना लक्ष्य केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com