Ashadhi Wari 2024: अवघे गर्जे पंढरपूर! अवघी पंढरपूर नगरी विठूनामाने दुमदुमली

भगव्या पताकांनी चंद्रभागा भगवी मय झाली आहे. टाळ मृदुंगाचा गजराने अवघी पंढरी नगरी दुमदुमून गेली आहे.

Ashadhi Wari 2024: चंद्रभागेच्या तिरी वैष्णवांचा मेळा, अवघी पंढरपूर नगरी विठूनामाने दुमदुमली. चंद्रभागेच्या तिरी भक्तीचा महापूर आलाय, "अवघे गर्जे पंढरपूर" हे दृश्य आज प्रत्यक्षात बघायला मिळतंय. आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरीत भक्तीचा महापूर आला आहे. आज जवळपास 15 लाखाहून अधिक भाविक वारीसाठी दाखल झाले आहेत. पंढरीत नगरी विठु नामाच्या जयघोषाने दुमदुमली आहे. काल मध्यरात्रीपासून पासून भाविकांनी पवित्र चंद्रभागा स्नानाची पर्वणी साधण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. चंद्रभागेकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले आहेत. दरम्यान आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजेला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्र्यांना सोबत यंदा नाशिक जिल्ह्यातील बाळू शंकर अहिरे व अशा बाळू अहिरे या वारकरी दाम्पत्याला शासकीय महापूजेसाठी उपस्थित राहण्याचा मान मिळाला आहे. अहिरे हे नाशिक जिल्ह्यातील अंबासन गावचे रहिवाशी असून ते मागील 16 वर्षांपासून नियमित पंढरीची वारी करतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com