शरद पवारांना पत्र लिहिणारा अकोल्यातील तरूण समोर.. तो म्हणतो, साहेबच माझं लग्न करून देतील|VIDEO

Mangesh From Akola Requests NCP Chief Sharad Pawar: अकोल्यातील ३४ वर्षीय मंगेश नावाच्या तरुणाने लग्नासाठी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहिलं आहे. साहेबच माझं लग्न करून देतील असं म्हणणाऱ्या मंगेशच्या या पत्रामुळे ग्रामीण भागातील लग्नाचा गंभीर प्रश्न चर्चेत आला आहे.

अकोल्यातील मंगेश नावाच्या ३४ वर्षीय तरुणाने लग्न होत नसल्याने थेट राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून पत्नी मिळवून देण्याची मागणी केली आहे. शरद पवार अकोल्यात शेतकरी संवाद कार्यक्रमासाठी आले असता, मंगेशने त्यांना हे निवेदन दिले, ज्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांच्या लग्नाचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावर बोलताना मंगेश म्हणाला, पवार साहेबांपर्यंत जो कुठला विषय गेला तर त्याच्यावर कुठला ना कुठला तोडगा निघतो. म्हणून मी पवार साहेबांजवळच गेलो. आपल्या पत्रात त्याने कोणत्याही समाजाची मुलगी चालेल आणि मुलीच्या घरीही राहण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. बी.ए. समाजशास्त्र शिक्षण झालेल्या मंगेशच्या या पत्रामुळे एक सामाजिक समस्या समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com