मतदानाआधी पैशांचा पाऊस! 50 लाखांची रोकड जप्त, नोटांच्या गड्ड्या पाहून पोलिसही चक्रावले|VIDEO

₹50 Lakh Cash Seized On Election Eve In Akola: अकोल्यात मतदानाच्या पूर्वसंध्येला पोलिसांनी 50 लाखांची रोकड जप्त केली आहे. पैसे वाटपाच्या आरोपावरून भाजप आणि ठाकरे सेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आले असून परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

राज्यभरात 29 महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असून या महापालिकांवर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकतो हे उद्या समजणार आहे. तत्पूर्वी मतदानच्या पूर्वसंध्येला मोठ्या प्रमाणात पैशांचे वाटप सुरू असून पैसे देऊन मत विकत घेतले जात आहे. अशातच अकोलामध्ये 50 लाखांची रोकड मिळाली असून नोटांचे बंडल पाहून पोलीस ही चक्रावले आहे.

अकोल्यातील प्रभाग क्रमांक 15 मधील सिंधी कँप भागात पैसे वाटपाच्या मुद्द्यावरून कालं रात्री भाजप आणि ठाकरे सेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. सिंधी कँप भागात मोठा तणाव निर्माण झाला होता. भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा ठाकरेसेनेच्या कार्यकर्त्यांचा आरोप होता. त्यानंतर दोन्ही गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आले होते. तर दुसरीकडे अकोल्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पकडण्यात आलेली 50 लाख रोख प्रकरणावर पोलीस स्पष्टच बोलले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com