Akola News: महाराष्ट्राच्या आंदोलकानं अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प सरकारकडं मागितला न्याय, नेमका प्रकार काय? | VIDEO

Akola Protester on Hunger Strike: अकोल्यात एका आंदोलकाने जमीन वादावर न्याय मिळावा म्हणून थेट ट्रम्प सरकारकडे साकडं घातलं आहे. २५ वर्षांच्या अतिक्रमणावर नोटीस आल्याने हा अनोखा उपोषणाचा मार्ग त्यांनी निवडला आहे.

अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणाऱ्या एका आंदोलकाच्या मागणीने सर्व चक्रावून गेलेयेत. या उपोषणकर्त्याने आपला प्रश्न सोडवण्यासाठी थेट अमेरिकेच्या ट्रम्प सरकारला साकडं घातलंय. ट्रम्प सरकारने आपल्या प्रश्नासंदर्भात थेट मोदी सरकारशी चर्चा करून आपल्याला न्याय द्यावा, अशी अफलातून मागणी या उपोषणकर्त्याने केलीये. दामोदर वासुदेव गावंडे असे या उपोषणकर्त्या आंदोलकाचे नाव आहेय. ते अकोला जिल्ह्यातील गोरेगाव बुद्रुक येथील रहिवासी आहे.

गावंडे यांनी 25 वर्षांपासून गावातील गट क्रमांक 112 मधील सरकारी 'इ क्लास' जमिनीवर घर बांधलंय. गावातील अनेक अतिक्रमणधारकांना ग्रामपंचायत आणि तहसील प्रशासनाने हक्क प्रमाणपत्र दिल्याचा दावा गावंडे यांनी केलाय. मात्र, आपल्यावर अन्याय करीत ग्रामपंचायत, तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने जागा खाली करण्याची नोटीस दिल्याचं त्यांनी म्हटलंय. अनेकदा शासन दरबारी खेटे मारूनही न्याय मिळत नसल्याने अखेर त्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबलाय. जर अमेरिका सरकारच्या सल्ल्याने भारत पाकिस्तानसोबतचं जिंकू शकणार युद्ध थांबू शकतो. तर आपल्या प्रश्नावरही ट्रम्प सरकारने हस्तक्षेप करीन मोदी सरकारला आपल्याला न्याय द्यायला लावावा अशी विनंती त्यांनी अमेरिकेला केलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com