Akola Crime : चॉकलेटचं आमिष देत मुलांना कपडे काढायला लावायचा; अकोल्यातील किळसवाणा प्रकार, पाहा VIDEO
मुंबई : अकोल्यामध्ये एक व्यक्ती चॉकलेटचं आमिष देत मुलांना कपडे काढायला लावायचा. याप्रकरणी पीडित मुलांच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. परंतु पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही, त्यामुळे संतापलेल्या पालकांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालयच गाठल्याचं समोर आलंय. पातुर शहरात चॉकलेट आणि बिस्कीटचं आमिष दाखवून तीन लहान मुलांची छेड होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.
पातूरमध्ये तीन अल्पवयीन मुलांसोबत 'आत्माराम ससाने' नावाचा व्यक्ती हे किळसवाणं कृत्य करत होता. यामुळे मुलं शाळेत जाण्यास नकार देत होते. त्यामुळे नातेवाईकांनी विचारणा केली असता, मुलांनी मागील महिनाभरापासून एक व्यक्ती सतत त्रास देत असल्याचं सांगितलं. चॉकलेटचं आमिष देत मुलांना कपडे काढायला लावायचा, असा आरोप कुटुंबियांनी केलाय. या प्रकरणामध्ये पातुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीय. परंतु अद्यापपर्यंत या व्यक्तीवर कुठलीही कारवाई न झाल्याने अखेर कुटुंबियांनी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठलंय. संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कुटुंबीयांकडून होतेय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.