VIDEO: अजित पवार यांचं केंद्रात वाढणार 'वजन'; ३ टर्म मंत्री असलेल्या बड्या नेत्याचा दावा

एनडीए सरकारसोबत असलेल्या अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केंद्रात मंत्रिपद मिळणार आहे, असा ठाम दावा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.

महायुतीच्या माध्यमातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने नुकतीच लोकसभा निवडणूक लढवली होती. महायुतीतून राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. त्यातील एका जागेवर पक्षाला विजय मिळाला. रायगडमधून सुनील तटकरे यांचा विजय झाला होता. मात्र, केंद्रात राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रिपद मिळू शकलं नव्हतं. मात्र, आता अजित पवार यांचं केंद्रात वजन वाढणार आहे. केंद्रात सलग तीन वेळा मंत्रिपद भूषवलेल्या रामदास आठवलेंनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.अजित पवार यांच्या पक्षाला केंद्रात एक मंत्रिपद मिळेल, असा दावा आठवले यांनी केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com