अपघातापूर्वीचा अजितदादांचा शेवटचा व्हिडिओ; शब्द ऐकून डोळे पाणावतील | VIDEO

Emotional Ajit Pawar Video Before Accident: सोशल मीडियावर अजित पवार यांचा शेवटचा व्हिडिओ असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवारी 28 जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाले. अजित पवारांच्या जाण्याने राजकीय वर्तुळात नव्हे तर राज्यातील घराघरात दु:खवटा होता. बारामतीमध्ये विद्याप्रतिष्ठानच्या मैदानामध्ये अजितदादांचे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी लाखोंच्या संख्येने जनसागर लोटला होता. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रु तरळत होते. अजित पवार यांचे निधन झाल्याच्या घटनेवर अजूनही अनेकांना विश्वास बसत नाही, दरम्यान आता त्याचा शेवटचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये अजितदादा नागरिकांना जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत आपल्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी भावनिक प्रतिक्रिया देत अश्रुंना वाट मोकळी करून दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com