महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक निकालानंतर 13 दिवसांनी अखेर आज नवीन सरकार स्थापन होत आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडत असून मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली तर एकनाथ शिंदे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह सर्व प्रमुख नेत्यांनी उपस्थिती लावली.
विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर 11 दिवसांनी महायुतीने काल सत्ता स्थापनेचा दावा राज्यपालांकडे दखल केला होता. त्यानंतर आज शपथविधी सोहळा होऊन महायुतीचं नवं सरकार स्थापन झालं आहे. निकालानंतर चाललेल्या नाराजी नाट्यानंतर अखेर आज नवीन सरकारची स्थापना झाली आहे. यात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
Edited By Rakhi Rajput
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.