Rohit Pawar Pc: अजितदादा परत येणार? काय म्हणाले रोहित पवार? VIDEO

Rohit Pawar Emotional Statement On Ajit Pawar Death: अजित पवार परत येणार का? सोशल मीडियावर व्हायरल दाव्यांवर आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती देत भावूक प्रतिक्रिया व्यक्त केली.

अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्यात संभ्रम आणि शंकेचे वातावरण निर्माण झाले होते. सोशल मीडियावर विविध दावे, व्हिडिओ आणि पोस्ट्स व्हायरल होत असताना या सगळ्या प्रकरणावर आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर आणि स्पष्ट माहिती दिली. रोहित पवार यांनी सांगितले की, काल मुंबईकडे येत असताना पिंपरी-चिंचवड परिसरात एक रिक्षावाला त्यांच्याकडे आला. ९ तारखेला तुम्ही अजितदादांच्या अपघाताबद्दल काही सांगणार होता, त्याचं काय झालं? असा प्रश्न त्याने विचारला. त्यावर आपण १० तारखेला याबाबत आपली भूमिका मांडणार असल्याचं त्याला सांगितल्याचं रोहित पवार म्हणाले.

या प्रकरणात काही लोक भावनिक होऊन सोशल मीडियावर व्हिडिओ टाकत असल्याचं सांगत रोहित पवार म्हणाले, “दादा परत येतील, विमानात सहा जण होते, सहावी व्यक्ती दादा होते, ती बॉडी दादांची नव्हती असे अनेक दावे केले गेले. दादा आज येतील, उद्या येतील, असंही सांगितलं गेलं. दादा परत आले तर मी त्यांना घट्ट मिठी मारीन, अशी भावनिक प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली. दादांचा अपघात झाला, ते सगळं एखाद्या स्वप्नासारखं वाटत होतं. पण जेव्हा दादांचा जळालेला स्वेटर, चप्पल आणि घड्याळ पाहिलं ते घड्याळ जे नेहमी १५ मिनिटे पुढे असायचं ते बंद अवस्थेत पाहिलं, तेव्हा ज्यांनी ते पाहिलं ते सगळे निशब्द झाले, असं सांगताना रोहित पवार भावूक झाले. यावेळी पत्रकार परिषदेत रोहित पवारांचे डोळे पाणावले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com