३७ व्या वर्षी अजिंक्य नाईक बनले MCAचे सर्वात तरुण अध्यक्ष|VIDEO

Ajinkya Naik Elected Unopposed: मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड झाली आहे. शरद पवार यांच्या पाठिंब्याने तरुण अजिंक्य नाईक यांनी अवघ्या ३७ व्या वर्षी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली असून, ते एमसीएच्या इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष ठरले आहेत.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची निवड झाली आहे. जुलै २०२४ मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांनी संजय नाईक यांचा १०७ मतांच्या फरकाने पराभव केला. अजिंक्य नाईक म्हणाले, 'हा मैदानी क्रिकेटचा विजय आहे'. या निवडणुकीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले होते, कारण अजिंक्य नाईक यांना शरद पवार यांचे समर्थन होते, तर त्यांचे प्रतिस्पर्धी संजय नाईक यांना भाजप नेते आणि बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार यांचा पाठिंबा होता. अवघ्या ३७ व्या वर्षी अध्यक्षपदी निवडून आल्याने, नाईक हे एमसीएच्या इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष ठरले आहेत. दिवंगत अध्यक्ष अमोल काळे यांच्या निधनानंतर ही निवडणूक घेण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com