Mumbai VIDEO: मुंबईतील विमानसेवा पुर्वपदावर, इतर ठिकांनी वळवलेली विमानसेवा पुन्हा मुंबईत

Mumbai Airlines News Update: मुसळधार पावसामुळे विस्कळीत झालेली विमानसेवा पुर्वपदावर, इतर ठिकांनी वळवलेली विमानसेवा पुन्हा मुंबईत दाखल.

मुंबईत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे विमानसेवा विस्कळीत झाली होती. मुसळधार पाऊस आणि कमी दृश्यमानतेमुळे पहाटे 2:22 ते पहाटे 3:40 पर्यंत धावपट्टीचे कामकाज थांबवण्यात आले होते. ही विमानसेवा दुसऱ्या ठिकाणी वळवण्यात आली होती. अहमदाबाद, हैदराबाद, इंदूरकडे विमानसेवा वळवण्यात आली होती. परंतु आता मुंबईतील विमानसेवा आता पुर्वपदावर आली आहे. इतर ठिकांनी वळवलेली विमानसेवा पुन्हा मुंबईत दाखल होत आहे. मुसळधार पावसाने मुंबईला झोडपून काढले आहे. जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईत लोकलसेवा आणि रस्ते वाहतुक खोळंबली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com