

Parth Pawar meets Supriya Sule Sharad Pawar for two hour discussion : आज सकाळपासूनच महाराष्ट्राच्या राजकारणातील घडामोडींना वेग आलाय. दिवगंत अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार, यावर आता जवळपास शिक्कामोर्तब झालेय. पण त्याआधीच शरद पवार यांनी याबाबत आपल्याला काही कल्पना नसल्याचे वक्तव्य केले होते. शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर पार्थ पवार यांनी तात्काळ भेट घेतली. पार्थ पवार यांनी पुण्यातील मोदी बागेत जात शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. जवळपास दोन तास चर्चा झाली. यामध्ये सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत पार्थ पवारांनी माहिती दिलेली असू शकते, असा अंदाज वर्तवला जातोय. त्याशिवाय दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनिकरणावरही चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर पार्थ पवार यांनी फोनवरून सुनेत्रा पवार यांच्यासोबत चर्चा केल्याचे बोलले जातेय. सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार यांच्यामध्ये मोदी बागेत चर्चा झाल्याचे व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत. त्यामध्ये दोघांमध्ये दीर्घ चर्चा झाल्याचे दिसतेय.
एकीकडे मुंबईमध्ये सुनेत्रा पवार यांची विधीमंडळाचा नेता म्हणून निवड करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात येत आहे. छगन भुजबळ, तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्याकडून बैठका घेण्यात येत आहे. दुसरीकडे पुण्यामध्ये पार्थ पवार यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा केली. पार्थ पवार-सुप्रिया सुळे यांच्यासोबत दोन तास चर्चा केली. पुढील काही काळात पार्थ पवार सक्रीय राजकारणात सक्रीय होतील, असे दिसतेय. पुण्यातून पार्थ पवार मुंबईकडे रवाना झाले आहेत. पार्थ पवार आई सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीला हजर राहतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.