ठाकरेंच्या युतीनंतर काल बेफाम नाचले, आज मनसेच्या प्रदेश सरचिटणीसने कमळ घेतलं|VIDEO

MNS State General Secretary Dinkar Patil Joins BJP: ठाकरे बंधूंच्या युतीनंतर जल्लोष करणाऱ्या मनसेच्या प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी अवघ्या 24 तासांत भाजपमध्ये प्रवेश केला.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेला मोठा दणका बसला आहे. मनसचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील हे आज त्यांच्या पत्नीसह भाजपवासी झाले आहे. बुधवारी ठाकरे बंधूंची युती जाहीर झाल्यानंतर शहरातील मनसे कार्यालयाबाहेर दिनकर पाटील यांनी मोठा जल्लोष साजरा केला आणि आज रेल्वे इंजिनमधून उतरून थेट कमळ हाती घेतले. या पक्षप्रवेशाने मनसेला मोठे खिंडार पडले आहे. हा पक्षप्रवेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला. त्यांच्यासह मनसेचे माजी महापौर यतीन वाघ, ठाकरे गटाचे माजी महापौर विनायक पांडे आणि कॉँग्रेसचे माजी नगरसेवक शाहू खैरे यांनी देखील कमळ हाती घेतले आहे. मात्र या पक्षप्रवेशाच्या आधी भाजप कार्यालयाबाहेर मोठा राडा झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com