भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्या ढाकणे कुटुंबियाला मारहाण केल्या प्रकरणी पोलीस कोठडीत आहे. तसेच खोक्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे. हिरण शिकार करणे तसे प्राण्यांची तस्करी करणे असे अनेक गंभीर गुन्हे त्याने केले असल्याचे उघडकीस आले होते. वनविभागच्या जागेवर त्याने बंगला बांधला होता. त्यानं तर त्याच्या घरावर वनविभागाने बुलडोझर देखील चालवला होता. अशातच आता त्याच्या समर्थनासाठी धाराशिवमध्ये आदिवासी समाज हा आक्रमक झाल्याचे पाहयाला मिळत आहे. सतीश भोसलेला खोक्या कोणीच बोलत नाही तर त्याचे नाव हे विठ्ठल आहे. आणि हे सगळे काही लोक मिडियामध्ये प्रसिद्धी मिळण्यासाठी करत आहे असे आदिवासी समाजाच्या लोकांनी सांगितले. तसेच सतीश भोसलेला लवकर सोडण्यात यावे नाहीतर राज्यव्यापी आंदोलन उगरले जाईल असा इशारा आदिवासी समाजाने दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.