अभिनेता इम्रान खानला न्यायालयाचा दिलासा; देश सोडण्याच्या नोटीसला स्थगिती

RELIEF FOR ACTOR IMRAN KHAN : बॉलीवूड अभिनेता इम्रान खानला न्यायालयाकडून २ नोव्हेंबरपर्यंत मोठा दिलासा मिळाला आहे. परदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालयाने त्याला भारत सोडण्याचे निर्देश दिले होते.

बॉलीवूड अभिनेता इम्रान खानला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. परदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालयाने त्याला २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याचे निर्देश दिले होते. मात्र, उच्च न्यायालयाने या नोटीसला आगामी २ नोव्हेंबरपर्यंत स्थगिती दिली आहे.

इम्रान खान हे अमेरिकेचे नागरिक असून त्यांच्याकडे 'ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया' कार्ड आहे. मुंबईत झालेल्या एका निदर्शनादरम्यान पोलीस कारवाईनंतर एफआरआरओने त्यांना देश सोडण्याची नोटीस बजावली होती. या नोटीसाविरोधात अभिनेत्याने उच्च न्यायालयात धाव घेत कारवाईच्या वैधतेला आव्हान दिले आहे.

मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान, केंद्र सरकारच्या वतीने न्यायालयात बाजू मांडण्यासाठी अधिक वेळ मागण्यात आला. तसेच पुढील सुनावणीपर्यंत त्यांच्याविरुद्ध कोणतीही बळजबरीची कारवाई केली जाणार नाही, अशी हमी देण्यात आली. यानंतर न्यायालयाने एफआरआरओचे निर्देश २ नोव्हेंबरपर्यंत स्थगित ठेवले. त्यामुळे इम्रान खान यांना तूर्तास मोठा दिलासा मिळाला असून, आता २ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीत न्यायालय काय निर्णय देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com