Dia Mirza : सेलिब्रेटी कॅम्पेनवरून वाद! अमित साटम यांनी अभिनेत्रीला सुनावले खडेबोल; BMC ने डिलीट केला व्हिडीओ

Mumbai Dia Mirza Amit Satam News : मुंबईतील वाढत्या वायू आणि ध्वनी प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर BMC ने फटाकेमुक्त दिवाळीचे आवाहन केले. दीया मिर्झाच्या व्हिडिओवर अमित साटम यांनी आक्षेप घेतल्यानंतर महापालिकेने व्हिडिओ हटवला.

मुंबईतील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर यंदाची दिवाळी फटाक्यांशिवाय साजरी करण्याचे आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे. यासाठी महापालिकेने विशेष जनजागृती मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत काही प्रसिद्ध कलाकारांचाही सहभाग घेण्यात आला आहे. मात्र, या मोहिमेमुळे आता नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. मुंबईतील हवेचे प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी नागरिकांनी दिवाळीत फटाके फोडणे टाळावे, असा संदेश या मोहिमेतून दिला जात आहे. यासाठी अभिनेत्री दीया मिर्झा हिचा व्हिडिओही महापालिकेने सोशल मीडियावर प्रसिद्ध केला होता. मात्र, या व्हिडिओवर मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी आक्षेप घेतला.

अमित साटम यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत महापालिकेच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. दिवाळी कशी साजरी करावी, हे सांगण्यासाठी दीया मिर्झासारख्या अभिनेत्रीची गरज नाही, असे त्यांनी म्हटले. भारतीय सण आणि परंपरा या आपल्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहेत. त्यामुळे दिवाळी साजरी करण्याबाबत बाहेरच्या व्यक्तीकडून शिकण्याची आवश्यकता नसल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.भाजपकडून आक्षेप घेतल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने दीया मिर्झाचा व्हिडिओ आपल्या हटवला. विशेष म्हणजे, हा व्हिडिओ का हटवण्यात आला, याबाबत महापालिकेकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.