राज्यात 'वंदे मातरम' बंधनकार करण्याला अबू आझमींचा विरोध|VIDEO

Religious Freedom And Vande Mataram Controversy: महाराष्ट्र सरकारने शाळांमध्ये ‘वंदे मातरम’ गायन सक्तीचं केल्यावरून राजकारण तापलं आहे. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी या आदेशाला विरोध दर्शवला असून भाजपनं त्यांच्यावर तीव्र टीका केली आहे.

'वंदे मातरम' या गाण्याच्या निर्मितीला 150 वर्षे पूर्ण होत असल्याने राज्य शासनाने नवीन आदेश प्रारीत केला आहे. शासनाने जारी केलेल्या पत्रामध्ये राज्यातील सर्व शाळांमध्ये वंदे मातरम हे गीत वाचनाचे आदेश देण्यात आले आहे. 31 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर दरम्यानच्या कालावधीमध्ये वंदे वातरम गायनाचे आदेश देण्यात आले आहे. मात्र या आदेशावरून आता राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी याला विरोध केला आहे. मुस्लिमांना वंदे मातरम म्हणण्यास भाग पाडणे चुकीचे आहे. प्रत्येक व्यक्तीची स्वतःची श्रद्धा असते आणि आपण प्रत्येकाच्या श्रद्धेचा आदर केला पाहिजे असे अबू आझमी म्हणाले.

यावरच भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी प्रतिउत्तर दिले आहे. जर या देशात राहायचे असेल तर 'वंदे मातरम' म्हणावेच लागेल. नाहीतर त्यांनी आपला बोरा बिस्तरा बांधून पाकिस्तानला जावे अशी टीका बन यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com