ऐन निवडणुकीत अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवेंमध्ये जुंपली; कोण काय म्हणालं? VIDEO

Abdul Sattar Statement Against Raosaheb Danve: नगरपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर अब्दुल सत्तार यांनी भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

सिल्लोड: नगरपरिषदेचे निकाल येताच पुन्हा एकदा अब्दुल सत्तार यांनी भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्यावर निशाणा साधला आहे. सिल्लोडमध्ये प्रचार करणाऱ्यांचा आम्ही भोकरदनमध्ये सुपडासाफ केल्याचं सत्तार म्हणाले आहे. स्वतःचं गाव वाचवू शकत नाही, ते सिल्लोडमध्ये प्रचार करत होते असा खोचक टोलाही सत्तार यांनी दानवेंना लगावला आहे. तसेच फुलंब्री आणि कन्नडमध्ये देखील आम्ही गणित बिघडवले असा सत्तारांनी टोला लगावला. विशेष म्हणजे भोकरदन हे रावसाहेब दानवेंचे होम ग्राउंड असून, कन्नडमध्ये त्यांची मुलगी संजना जाधव भाजपचे आमदार आहेत. या दोन्ही ठिकाणी भाजपला पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे पुन्हा एकदा सत्तार विरुद्ध रावसाहेब दानवे असा राजकीय वाद पाहायला मिळतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com