Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते नारायण गडावर विठ्ठल रूक्मिणीची पूजा

Vitthal Rukmini Pooja By Manoj Jarange On Narayangad: आषाढी एकादशीच्या मुहुर्तावर मनोज जरांगे पाटलांनी विठ्ठल रूक्मिणीची पूजा केलीय. नारायणगडावर ही पूजा करण्यात आलीय.

बीड : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाणारे धाकटी पंढरी श्रीक्षेत्र संस्थान नारायण गड येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा करण्यात आलीय. संत कुलभूषण महात्मा नगद नारायण महाराज यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. यावेळी गडाचे महंत शिवाजी महाराजांच्या उपस्थितीमध्ये महापूजा करण्यात आलीय. मध्यरात्री बारा वाजून दहा मिनिटांनी ही पूजा केली गेलीय. राज्यात भरपूर पाऊस पडू दे, येथील शेतकरी सुखी होवो. शेतकऱ्यांना चांगले दिवस यावेत, असे साकडे मनोज जरांगे पाटील यांनी विठ्ठलाकडे घातल्याची माहिती मिळतेय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com