Ashadh Wari: दोनशे वर्षांपासून पाऊले चालती पंढरीची वाट, नारायण गडची दिंडी सोहळा करणार पंढरपूकडे मार्गक्रमण|VIDEO

200-year-old spiritual procession from Narayan Gad: श्रीक्षेत्र नारायण गड येथून दोनशे वर्षांची परंपरा असलेली दिंडी यावर्षी २५ जूनपासून पंढरपूरकडे मार्गक्रमण करणार आहे. दहा हजाराहून अधिक भाविकांचा सहभाग असून, दिंडीत वैद्यकीय आणि पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

दोनशे वर्षाहून अधिक परंपरा असलेली राज्याची धाकटी पंढरी श्रीक्षेत्र संस्थान नारायण गड दिंडी सोहळा यावर्षीही मोठ्या उत्साहामध्ये नारायण गडावरून पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहे. या दिंडी सोहळ्यामध्ये दहा हजाराहून अधिक भाविक सहभागी होणार असल्याची माहिती दिंडी सोहळ्याचे मार्गदर्शक गडाचे महंत शिवाजी महाराज यांनी माहिती दिली असून 25 जून रोजी नारायण गडावरून दिंडी सोहळा प्रस्थान होणार आहे. या दिंडी सोहळ्यामध्ये वैद्यकीय पथक ॲम्बुलन्स पिण्यासाठी मुबलक पाणी याची सोय करण्यात आली आहे. या दिंडी सोहळ्यामध्ये नऊ मुक्काम असणार आहेत. मोठ्या उत्साहामध्ये दिंडी सोहळ्यात भाविक भक्त सहभागी होणार असून अनअधिकालाची परंपरा कायम ठेवत दिंडी सोहळा मार्ग क्रमन करणार असल्याचे गडाचे महंत शिवाजी महाराज यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com