Vastu Tips : सावधान! पैसे मोजताना चुकूनही करू नका 'ही' चूक; होऊ शकतं मोठं नुकसान!

काही वेळा अनेकजण पैसे मोजताना नको त्या चुका करतात. ज्यामुळे भारी नुकसान होऊ शकतं.
Vastu Tips For Money
Vastu Tips For Money Saam TV
Published On

Vastu Tips For Money : पैशांमध्ये लक्ष्मीचं रूप असतं, असं नेहमी म्हटलं जातं. पैसे म्हणजेच धन आणि धनाला सर्वसामान्य माणसापासून श्रीमंतापर्यंत सगळेचजण (Vastu Tips) लक्ष्मी मानतात. जेव्हा-जेव्हा धनलाभ होतो तेव्हा-तेव्हा घरात लक्ष्मी आली असं अनेकजण म्हणतात. पण, काही वेळा अनेकजण हीच लक्ष्मी म्हणजेच पैसे मोजताना नको त्या चुका करतात. ज्यामुळे भारी नुकसान होऊ शकतं.

Vastu Tips For Money
Snake Attack : अरे बापरे! दारूड्याला चावताच सापाने गमावला जीव; पाहा धक्कादायक VIDEO

पैसे मोजताना कधीच थुंकीचा वापर करू नका

तुमच्या हातात बऱ्याच वेळा पैसा (Money) येतो. जितका लवकर हा पैसा येतो तितक्या लवकर तो निघूनही जातो. म्हणजेच पैसे आल्यावर नको तेवढे खर्च होतात. असे झाल्याच समजून जा की तुमच्या वास्तुमध्ये दोष आहे. वास्तुच्या मते पैसे मोजताना कधीच त्यावर थुंकीचा वापर करू नये. असे केल्यास पैशांचा अनादर होतो आणि लक्ष्मी माता तुमच्यावर नाराज होते. जर नोटा एकमेकांना चिपकल्या असतील थुंकी ऐवजी पाण्याचा वापर करा. (Maharashtra News)

खाण्या-पिण्याच्या गोष्टी ठेवू नये

तुम्ही पर्समध्ये पैसे ठेवले असतील तर त्यासोबत कधीच खाण्या-पिण्याच्या गोष्टी ठेवू नका. याव्यतिरिक्त पर्समध्ये कोणत्याही प्रकारची थकबाकी असलेले बिलाची पावती ठेवू नका. त्याचबरोबर पैसे जर हातातून खाली पडले तर त्याला नमन करून म्हणजेच ते डोक्याला लावूनच पर्समध्ये ठेवा. असे न केल्यास समजून जा की भविष्यात तुम्हाला मोठ्या आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो.

पैशांसोबत कधीच खेळू नका

काही लोकांना चिल्लर नाण्यांसोबत खेळण्याची सवय असते. अनेकदा ते नाणी वर फेकून झेलत असतात. तर काही लोकं नाण्याचा उपयोग टॉस म्हणूनही करतात. लक्षात ठेवा हा अत्यंत चुकीचा मार्ग मानला जातो. असे केल्यास लक्ष्मी मातेचा अपमान होतो. भविष्यात तुम्ही कंगाल होऊ शकतात.

कोठेही पैसे ठेवणे

काही जणांना टेबल, खिडकी, बेडवर पैसे ठेवण्याची सवय असते. पगार झाल्यावर अनेकजण पैसे आपापल्या ठरलेल्या जागेवर ठेवतात. असं न करता पैसे तिजोरीत किंवा कपाटातच ठेवा. इकडे-तिकडे पैसा ठेवलात तर गरिबीला आमंत्रण द्याल

(वरील माहिती शास्त्रावर आधारित आहे. वाचकांच्या आवडीनुसार ती येथे सादर केली आहे. याची आम्ही कुठलीही शाश्वती घेत नाही)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com