NZ vs ENG: जॅक क्रॉलीने रचला इतिहास! 147 वर्षांत असा रेकॉर्ड करणारा ठरला दुसराच फलंदाज

Zak Crawley Record: न्यूझीलंडविरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात झॅक क्रॉलीने इतिहास रचला आहे.
NZ vs ENG: जॅक क्रॉलीने रचला इतिहास! 147 वर्षांत असा रेकॉर्ड करणारा ठरला दुसराच फलंदाज
zak crawleytwitter
Published On

इंग्लंडचे फलंदाज सध्या तुफान फॉर्ममध्ये आहेत. इंग्लंडकडून खेळणाऱ्या जॅक क्रॉलीने असा काही कारनामा केला आहे, जो कसोटी क्रिकेटच्या १४७ वर्षांच्या इतिहासात कोणालाच करता आला नव्हता.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिला अधिकृत कसोटी सामना १८७७ मध्ये खेळला गेला होता. आता २०२४ मध्ये जॅक क्रॉलीने असं काही केलंय जे केवळ दुसऱ्यांदा घडलंय. यापूर्वी ख्रिस गेलने हा कारनामा केला आहे.

जॅक क्रॉलीने रचला इतिहास

जॅक क्रॉली हा कसोटी क्रिकेटमधील केवळ दुसराच फलंदाज ठरलाय ज्याने कसोटी क्रिकेटमधील पहिल्याच चेंडूवर षटकार मारला आहे. इंग्लंडकडून फलंदाजी करताना, जॅक क्रॉली फलंदाजी करत होता. तर टीम साऊदी गोलंदाजीला आला, क्रॉलीने शेवटच्या चेंडूवर खणखणीत षटकार मारला.

NZ vs ENG: जॅक क्रॉलीने रचला इतिहास! 147 वर्षांत असा रेकॉर्ड करणारा ठरला दुसराच फलंदाज
IND vs AUS 2nd Test Day 1: ॲडलेड टेस्टचा पहिला दिवस ऑस्ट्रेलियाच्या नावावर, स्टार्कनंतर मॅकस्विनीची दमदार खेळी

यापूर्वी २०१२ मध्ये ख्रिस गेलने फलंदाजीला करताना, पहिल्याच षटकात षटकार मारला होता. गेलने या षटकात फलंदाजी करताना १ नव्हे, तर २ षटकार मारले होते. त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात षटकार मारुन केली होती. आता जॅक क्रॉली असा कारनामा करणारा दुसराच फलंदाज ठरला आहे.

NZ vs ENG: जॅक क्रॉलीने रचला इतिहास! 147 वर्षांत असा रेकॉर्ड करणारा ठरला दुसराच फलंदाज
IND vs AUS 2nd Test Day 1: अ‍ॅडलेटमध्ये टीम इंडिया ढेपाळली; फलंदाज अपयशी होण्याची आहेत ३ मोठी कारणं

षटकार मारुन सुरुवात पण फलंदाजीत फ्लॉप

क्रॉलीने डावाची सुरुवात षटकार मारुन केली, पण दोन्ही डावात तो फ्लॉप ठरला. त्याने पहिल्या डावात फलंदाजी करताना २३ चेंडूत १ चौकार आणि १ षटकाराच्या साहाय्याने १७ धावांची खेळी केली. त्यानंतर दुसऱ्या डावातही त्याचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. त्याला दुसऱ्या डावात अवघ्या ७ धावा करता आल्या.

एटकिंसनने घेतली हॅट्रीक

या डावात गोलंदाजी करताना इंग्लंडचा वेगवान गोलंदाज गस एटकिंसनने हॅट्रीक घेण्याचा कारनामा केला आहे. त्याने ३५ व्या षटकात गोलंदाजी करताना, न्यूझीलंडच्या नाथन स्मिथ, मॅट हेनरी आणि टीम साऊदीला एकापाठोपाठ एक बाद करत आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील पहिली हॅट्रीक पूर्ण केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com