IML 2025: पंगा घ्यायचा नाय..युवराज अन् वेस्टइंडिजचा गोलंदाज भरमैदानात भिडले; पाहा VIDEO

Yuvraj Singh vs Tino Best: इंटरनॅशनल मास्टर्स लीग स्पर्धेतील फायनलमध्ये युवराज सिंग आणि टिनो बेस्ट भिडले, ज्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय.
Yuvraj singh
Yuvraj singhtwitter
Published On

रायपूरमध्ये इंटरनॅशनल मास्टर्स लीग स्पर्धेतील फायनलच्या सामन्याचा थरार रंगला. या स्पर्धेतील फायनलमध्ये इंडिया मास्टर्स आणि वेस्टइंडिज मास्टर्स हे दोन्हीसंघ आमनेसामने आले होते. या सामन्यात इंडिया मास्टर्स संघाने दमदार कामगिरी करत शानदार विजयाची नोंद केली. या सामन्या दोन्ही संघतील खेळाडूंकडून चौकार-षटकारांचा पाऊस पाहायला मिळाला.

यादरम्यान खेळाडूंमध्ये बाचाबाची झाल्याचेही पाहायला मिळाले. भारताचा आक्रमक फलंदाज युवराज सिंग आणि वेस्टइंडिजचा वेगवान गोलंदाज टीनो बेस्ट या दोघांमध्ये मैदानावरच राडा झाला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Yuvraj singh
IND vs NZ: टीम इंडिया तर मालामाल पण न्यूझीलंडवरही पैशांचा पाऊस; पाहा दोन्ही संघांना किती मिळाली प्राईज मनी

युवराज अन् टीनो बेस्ट भिडले

तर झाले असे की, भारतीय संघाची फलंदाजी सुरु असताना टीनो बेस्ट गोलंदाजी करत होता. बेस्टने आपलं षटक पूर्ण केलं आणि त्यानंतर दुखापतीचा बहाणा देऊन त्याला मैदानाबाहेर जायचं होतं. मात्र युवराज सिंगने प्रश्न उपस्थित केले. युवराजने ही बाब अंपायरच्या लक्षाच आणून दिली. अंपायरनेही बेस्टला मैदानावरच राहायला सांगितलं.

Yuvraj singh
Ind vs Nz Live : लाइव्ह सामन्यादरम्यान चाहते गौतम गंभीरवर भडकले, काय आहे नेमकं प्रकरण? वाचा

या निर्णयामुळे बेस्ट नाराज झाला. तो युवराजच्या दिशेने गेला आणि आपला संताप व्यक्त केला. दोघांमध्ये बाचाबाची झाली. दोन्ही खेळाडू एकमेकांना काहीतरी बोलताना दिसून आले. त्यावेळी अंबाती रायुडू आणि ब्रायन लारा दोघांनाही समजावताना दिसून आले.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर या सामन्यात वेस्टइंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात ब्रायन लाराला मोठी खेळी करता आली नाही. तो ६ धावा करत माघारी परतला. त्यानंतर पर्किन्स ६ धावांवर तंबूत परतला.

हे फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यानंतर, लेंडल सिमन्स आणि ड्वेन स्मिथने मोर्चा सांभाळला. स्मिथने ३५ चेंडूंचा सामना करत ४५ धावांची खेळी केली. तर सिमन्सने ५७ धावा चोपल्या. या खेळीच्या बळावर वेस्टइंडिजने २० षटकअखेर ७ गडी बाद १४८ धावा केल्या.

भारताला हा सामना जिंकण्यासाठी १४९ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंडिया मास्टर्स संघाकडून अंबाती रायडू आणि सचिन तेंडुलकर या जोडीने ६७ धावांची सुरुवात करुन दिली. सचिनने २५ धावा केल्या. तर रायडूने ७४ धावा चोपल्या. शेवटी युवराज सिंग आणि स्टुअर्ट बिन्नीने महत्वाची खेळी करुन संघाला विजय मिळवून दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com