Year Ender 2024: टीम इंडियासाठी 2024 वर्ष ठरलं लकी! T-20 WC जिंकण्यासह केले हे खास रेकॉर्ड्स

Team India Records In 2024: भारतीय संघाने २०२४ वर्षात आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेची ट्रॉफी उंचावली. यासह काही खास रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहेत.
Year Ender 2024: टीम इंडियासाठी 2024 वर्ष ठरलं लकी! T-20 WC जिंकण्यासह केले हे खास रेकॉर्ड्स
World Cup WinnerTwitter
Published On

भारतीय संघाला २०२४ चा शेवट हवा तसा करता करता आलेला नाही. वर्षातील शेवटचा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.

शेवट कडू झाला असला तरीदेखील भारतीय संघाने या वर्षात असं काही करून दाखवलं आहे, जे यापूर्वी कधी घडलं नव्हतं. काही महत्त्वाच्या मालिका गमावल्या, पण तरीसुद्धा हे वर्ष भारतीय संघासाठी लकी ठरलं आहे. यावर्षी काय काय घडलं? जाणून घ्या. .

Year Ender 2024: टीम इंडियासाठी 2024 वर्ष ठरलं लकी! T-20 WC जिंकण्यासह केले हे खास रेकॉर्ड्स
IND vs AUS: रोहित - विराट सिडनीत शेवटचा सामना खेळणार? दिग्गज खेळाडूचं मोठं वक्तव्य

रोहितच्या नेतृत्वात उंचावली टी -२० वर्ल्डकपची ट्रॉफी

याच वर्षी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेची ट्रॉफी उंचावली. भारतीय संघ गेल्या १७ वर्षांपासून या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होता. अखेर हे स्वप्नं पूर्ण झालं.

यापूर्वी २०१४ मध्ये भारतीय संघाने फायनलमध्ये प्रवेश केला होता. मात्र फायनलमध्ये श्रीलंकेकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. यावेळी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत या स्पर्धेची ट्रॉफी उंचावली.

Year Ender 2024: टीम इंडियासाठी 2024 वर्ष ठरलं लकी! T-20 WC जिंकण्यासह केले हे खास रेकॉर्ड्स
IND vs AUS: बॅटिंगनंतर आता बॉलिंगमध्येही हेड नडला! पंतची विकेट ते आगळं वेगळं सेलिब्रेशन का केलं? जाणून घ्या कारण

आयसीसीच्या रँकिंगमध्ये भारतीय संघाचा जलवा

टी -२०

भारतीय संघाने २०२४ वर्षाची सुरुवात दमदार केली होती. भारताचा संघ आयसीसीच्या टी -२० रँकिंगमध्ये अव्वल स्थानी होता. भारतीय संघाने २६८ रेटिंग पॉइंट्ससह अव्वल स्थान गाठलं होतं. भारतीय संघाने ही रेटिंग कायम ठेवली आहे.

वनडे

टी -२० सह वनडे क्रिकेटमध्येही भारतीय संघाने आपलं अव्वल स्थान टिकवून ठेवलं होतं. भारतीय संघ ११८ रेटिंग पॉइंट्ससह अव्वल स्थानी होता. आतापर्यंत भारतीय संघाने ही रेटिंग कायम ठेवली आहे.

कसोटी क्रिकेट

या वर्षाच्या सुरुवातीला भारतीय संघ १२२ रेटिंग पॉइंट्ससह अव्वल स्थानी होता. मात्र त्यानंतर भारतीय संघाने काही मालिका गमावल्या, त्यामुळे भारतीय संघाची रँकिंग घसरली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com