IND VS WI: कसोटी संघातून पुजारा, उमेशची होणार सुट्टी! तर IPL गाजवणाऱ्या 'या' खेळाडूंना मिळणार टीम इंडियात संधी

Indian Team: आता भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या नव्या हंगामासाठी सज्ज झाला आहे.
team india
team india saam tv
Published On: 

India Tour Of West Indies: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेता अंतिम सामना नुकताच पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या नव्या हंगामासाठी सज्ज झाला आहे.

भारतीय संघ कसोटी,वनडे आणि टी-२० मालिका खेळण्यासाठी वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. तर काही नविन खेळाडू या मालिकेत खेळताना दिसुन येऊ शकतात.

team india
Gautam Gambhir On WTC Final 2023: भारताने व्यक्तिपूजेतून बाहेर पडायला हवे; गौतम गंभीरचा रोख नेमका कुणाकडे?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या नव्या हंगामासाठी खेळाडू तयार करण्याची मोहिम वेस्ट इंडिज दौऱ्यावर होणाऱ्या कसोटी मालिकेपासुन होऊ शकते. या मालिकेत संघातील वरिष्ठ फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि उमेश यादवला संघाबाहेर केलं जाऊ शकतं. त्यांच्याऐवजी यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमारला संधी दिली जाऊ शकते.

निवड समितीचे माजी सदस्य देवांग गांधी यांनी पीटीआयसोबत बोलताना म्हटले की, 'मला असं वाटतं की, यशस्वी जयस्वाल हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी तयार आहे. त्याने रणजी, इराणी आणि दिलीप ट्रॉफी स्पर्धेत दुहेरी शतकी खेळी केली आहे. तो एक कौशल्यवान खेळाडू आहे. त्याला संधी मिळाली तर त्याच्यात आणखी सुधारणा होऊ शकते.'

बीसीसीआयच्या आणखी एका निवडकर्त्याने म्हटले की, 'हे पाहा उमेश यादव हा आपल्या कारकीर्दीतील शेवटच्या टप्प्यात आहे. मात्र भारतीय अ संघाचा कुठल्याही दौऱ्यावर गेला नाही. त्यामुळे उमेशची जागा घेण्यासाठी कोण सज्ज आहे. हे कळु शकलं नाही. एक वेळ अशी देखील होती जेव्हा मयांक अगरवाल, रिषभ पंत, हनुमा विहारी आणि नवदीप सैनी सारखे खेळाडू भारतीय अ संघासाठी चांगली कामगिरी करुन राष्ट्रीय संघासाठी खेळण्यासाठी तयार असायचे. ' (Latest sports updates)

team india
R Ashwin On WTC Final: अखेर मौन सोडलं... WTC च्या अंतिम सामन्यात संधी न मिळाल्याबद्दल अश्विनने केलं मोठं विधान

तसेच ते पुढे म्हणाले की, 'वेस्ट इंडिज दौऱ्यावरील सर्वात मोठी समस्या म्हणजे, जर त्याने या दौऱ्यावर धावा केल्या तर त्याला येणाऱ्या वर्षात संघाबाहेर करणं कठीण होऊन जाईल. भारतीय संघाला पुढील कसोटी सामना हा डिसेंबर महीण्यात खेळायचा आहे.

त्यामुळे आता जर युवा खेळाडूला संधी दिली गेली तर, तो खेळाडू येणाऱ्या आव्हानासाठी तयार असेल.' काही दिग्गजांचं असं देखील म्हणणं आहे की,शुभमन गिलला कर्णधारपदासाठी तयार करण्याची ही योग्य वेळ आहे.'

काही दिवसांपुर्वी आयपीएल २०२३ स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत युवा खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळाला. वेस्ट इंडिज दौऱ्यावर भारतीय संघाला ५ टी-२० सामन्यांती मालिका खेळायची आहे.

या मालिकेसाठी काही युवा खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते. ज्यात रिकुं सिंग आणि जितेश शर्मासारख्या खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते. तर अनुभवी गोलंदाज मोहित शर्मा या मालिकेतुन पुनरागमन करताना दिसुन येऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.