Gautam Gambhir On WTC Final 2023: भारताने व्यक्तिपूजेतून बाहेर पडायला हवे; गौतम गंभीरचा रोख नेमका कुणाकडे?

WTC Final 2023: वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणाऱ्या गौतम गंभीरने या पराभवानंतर लक्षवेधी वक्तव्य केलं आहे.
gautam gambhir
gautam gambhirsaam tv
Published On

IND VS AUS WTC FINAL 2023: भारतीय संघाला सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. यासह भारतीय संघाची आयसीसीची ट्रॉफी जिंकण्याची प्रतीक्षा आणखी लांबणीवर गेली आहे.

या पराभवानंतर अनेक दिग्गज खेळाडू पराभवाची कारणं सांगताना दिसून येत आहेत. तसेच काही दिग्गज, खेळाडूंवर टीकेबाजी करताना दिसून येत आहेत. दरम्यान नेहमी वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणाऱ्या गौतम गंभीरने या पराभवानंतर लक्षवेधी वक्तव्य केलं आहे.

gautam gambhir
WTC FINAL 2023: गेली १० वर्षे भारतीय संघ ICC ची ट्रॉफी का जिंकू शकला नाही? स्वतः राहुल द्रविडने सांगितलं कारण

भारतीय संघ गेल्या १० वर्षांपासून आयसीसीची ट्रॉफी जिंकण्याच्या प्रयत्नात आहे. २०१३ मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते.

त्यानंतर भारतीय संघाने उपांत्य फेरीत आणि अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. मात्र जेतेपद मिळवण्यात भारतीय संघ अपयशी ठरला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला २०९ धावांनी पराभूत करत पुन्हा एकदा आयसीसीची ट्रॉफी जिकंण्याचं स्वप्न धुळीस मिळवलं आहे. (Latest sports updates)

gautam gambhir
WTC 2023 Final: 'ICC पेक्षा IPL परवडली..'दारुण पराभवानंतर रोहितने आयसीसीला दाखवला आरसा

या सामन्यानंतर गौतम गंभीरने मोठं वक्तव्य केलं आहे. त्याने म्हटले की, आपल्या देशातील लोकं हे भारतीय संघाचे चाहते नाहीत, तर त्यांच्या आवडत्या खेळाडूंचे चाहते आहेत. आपण आपल्या संघापेक्षा एका व्यक्तीला जास्त मोठं मानतो. मात्र इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडसारख्या देशात संघ हाच एका व्यक्तीपेक्षा जास्त मोठा असतो. भारतीय क्रिकेट असो वा भारतीय राजकारण, भारताने या व्यक्तीपूजेतून बाहेर पडायला हवे.

तसेच तो पुढे म्हणाला की, 'संघाचा कायापालट करण्याच्या बाबतीत ऑस्ट्रेलिया संघ इतर संघांपेक्षा चांगला आहे. कारण आपल्याकडे दिग्गज खेळाडू तयार केले जात नाही. जर तुम्ही पाहिलं तर अॅडम गिलख्रिस्टने इयान हेलीला सहजरित्या रिप्लेस केलं होतं.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com