Yashasvi Jaiswal Bowling : बॅट्समन यशस्वीचा शेन वॉर्न अवतार! फलंदाजांना बोटावर नाचवलं, तीन खेळाडूंना तंबूत पाठवलं

Yashasvi Jaiswal Bowling Video: यशस्वी जयस्वालचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.
yashasvi jaiswal bowling video
yashasvi jaiswal bowling videoinstagram
Published On: 

VIRAL VIDEO: आयपीएल २०२३ स्पर्धा गाजवणारा युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल सध्या जोरदार चर्चेत आहे. भारत विरुद्व वेस्ट इंडिज या दोन्ही संघामध्ये १२ जुलैपासून पहिला कसोटी सामना रंगणार आहे.

या सामन्यासाठी यशस्वी जयस्वालला रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करण्याची संधी दिली जाऊ शकते. दरम्यान या सामन्यापूर्वी यशस्वी जयस्वालचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे. (Yashasvi Jaiswal Bowling Video)

yashasvi jaiswal bowling video
India vs West Indies: टीम इंडियाची घोषणा अन् 'या' 3 खेळाडूंची कारकीर्दच संपली ! आता निवृत्तीशिवाय पर्याय नाही

यशस्वी जयस्वाल हा आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो मात्र या आक्रमक फलंदाजाला तुम्ही कधी गोलंदाजी करताना पाहीलं आहे का? क्वचितच पाहीलं असेल. मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये यशस्वी जयस्वाल गोलंदाजी करताना दिसतोय. इतकेच नव्हे तर, विकेट्स घेताना देखील दिसुन येत आहे. (Viral Video Video)

yashasvi jaiswal bowling video
Team India Playing 11: पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची प्लेइंग 11; आक्रमक फलंदाजाला राहावं लागेल संघाबाहेर

गोलंदाजी करताना घेतल्या ३ विकेट्स..

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहु शकता की, यशस्वी जयस्वाल लेग स्पिन गोलंदाजी करताना दिसुन येत आहे. यादरम्यान त्याने गोलंदाजी करताना त्याने ३ विकेट्स देखील घेतल्या आहेत. पहिला चेंडू त्याने शॉर्ट टाकला ज्यावर फलंदाजाने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. (Latest sports updates)

मात्र त्याचा प्रयत्न फसला आणि तो झेलबाद झाला. तर दुसरा चेंडू बॅटच्या खाली होता, मात्र यावेळी देखील फलंदाजाचा अंदाज हुकला आणि तो झेलबाद झाला. तर ऑफ साईडच्या बाहेरच्या लाईनवर चेंडू टाकत त्याने तिसरी विकेट मिळवली.

हे ३ विकेट्स त्याने वेगवेगळ्या षटकात मिळवल्या. हा व्हिडिओ मुंबई टी -२० लीग स्पर्धेतील आहे. जो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.