World Cup Trophy In Pune: वर्ल्डकपची ट्रॉफी आज पुण्यात, फॅन्सना अगदी जवळून पाहण्याची संधी; चेक करा वेळ आणि स्थळ

World Cup Trophy Tour: पुणेकरांना वर्ल्डकपची ट्रॉफी अगदी जवळून पाहण्याची संधी मिळणार आहे.
world cup trophy tour in pune know the location and time of world cup trophy rally in pune
world cup trophy tour in pune know the location and time of world cup trophy rally in puneSaam tv news
Published On: 

World Cup Trophy In Pune:

आगामी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा थरार भारतात रंगणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघांनी कसून सरावाला सुरूवात देखील केली आहे. वर्ल्डकप हा मोठा इव्हेंट असल्याने आयोजकांकडून जय्यत तयारी केली जात आहे.

या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर वर्ल्डकप ट्र्रॉफी टुर सुरू आहे. दरम्यान आता पुणेकरांना ही मानाची ट्रॉफी अगदी जवळून पाहता येणार आहे.

world cup trophy tour in pune know the location and time of world cup trophy rally in pune
IND vs AUS, Playing 11: राजकोट वनडेसाठी टीम इंडियात होणार मोठे बदल! शुबमन गिलसह हा प्रमुख खेळाडू राहणार बाहेर

वर्ल्डकप ट्रॉफीची भव्य मिरवणूक मंगळवारी(२६ सप्टेंबर) काढण्यात येणार आहे. या मिरवणूकीसाठी ज्या बसचा वापर केला जाणार आहे त्या बसचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. या भव्य मिरवणुकीत निळ्या रंगाच्या ओपन बसचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे पुणेकरांना ही ट्रॉफी जवळून पाहण्याची संधी मिळणार आहे. (Latest sports updates)

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी या व्हिडिओमध्ये या मिरवणुकीबाबत माहिती दिली आहे. ही मिरवणूक मंगळवारी दुपारी १ वाजता काढली जाणार आहे. तर ही मिरवणूक JW Marriott हॉटेलपासून काढण्यात येणार आहे. त्यानंतर कृषी महाविद्यालय, पुणेच्या मैदानावर ही ट्रॉफी सर्वांसमोर प्रदर्शनासाठी ठेवली जाणार आहे.

world cup trophy tour in pune know the location and time of world cup trophy rally in pune
Asian Games 2023: सुवर्णकन्या! टीम इंडियाच्या रणरागिनी लंकेवर पडल्या भारी;थरारक विजयासह पटकावलं गोल्ड मेडल

पुण्यात होणार या सामन्यांचे आयोजन..

भारत विरुद्ध बांग्लादेश- १९ ऑक्टोबर, २०२३

अफगाणिस्तान विरुद्ध क्वालिफायर २- ३० ऑक्टोबर, २०२३

न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका- १ नोव्हेंबर, २०२३

इंग्लंड विरुद्ध क्वालिफायर १- ८ नोव्हेंबर, २०२३

ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांग्लादेश- १२ नोव्हेंबर,२०२३

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.