वर्ल्डकप 2023 मधील भारत आणि पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यामध्ये भारतीय संघाने ७ विकेटने विजय मिळवला. पाकिस्तान संघाने दिलेल्या १९१ धावांचा पाठलाग भारताने ३०.०३ षटकात पूर्ण केलं. कर्णधार रोहित शर्माच्या तुफानी अर्धशतकाच्या जोरावर भारताने वर्ल्ड कपमधील विजयाची हॅट्रीक पूर्ण केलीय. भारतीय संघाच्या विजयाचा आनंदोत्सव कोल्हापूरमध्ये पाहायला मिळाला. (Latest News)
भारत पाकिस्तानचा सामना हा अनेक क्रिकेट चाहत्यांचा जिव्हाळ्याचा विषय असतो. मग हे क्रिकेट चाहते पाकिस्तानमधील असो किंवा भारतातील. दोन्ही देशातील चाहत्यांमध्ये सामन्याविषयी कमालीचा उत्साह असतो. दोन्ही देशाच्या खेळांडूमध्ये सामना खेळण्यासाठी उत्साह असतो तितकाच जोश चाहत्यांमध्ये असतो.
आजचा दिवस भारतीय क्रिकेट संघाचा आणि भारतीय चाहत्यांचा ठरला. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तानचा संघ दुसऱ्यांदा आमने-सामने आला. पाकिस्तानच्या संघाला या वर्ल्डकपमध्ये भारताकडून दुसऱ्यांदा पराभव स्विकारावा लागला. भारताने पाकिस्तानला पराभव केल्यानंतर देशभरात आनंद साजरा केला जातोय. भारत आता थेट अंतिम सामन्यात जाणार असल्याचा विश्वास आता चाहते बोलून दाखवत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना भारतीय संघानी हा आनंदोत्सव फटाक्यांची आतीषबाजी कर साजरा केला. शहरातील ठिकाठिकाणी क्रिकेट चाहत्यांनी ब्रँण्ड वाजवत आनंद साजरा करत टीम इंडियाच्या खेळाडूंचं अभिनंदन केलं. कोल्हापुरातील शिवाजी चौक परिसरात भारत पाकिस्तान मॅचनंतर कोल्हापूरकरांनी मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला.
उत्तर प्रदेशातील अनेक क्रिकेट चाहत्यांनी देखील फटाके फोडत आनंद साजरा केला. भारतीय चाहत्यांनी आजच्या सामन्याचा मोठा आनंद घेतला. भारतीय संघाने चांगली कामगिरी करत विजयाची हॅट्रीक मिळवल्याने देशातून खेळाडूंचं कौतुक केले जात आहे. भारत अंतिम फेरीत जाणार विश्वकप जिंकणार असा, विश्वास अनेकांनी बोलून दाखवला. टीम इंडिया विश्वकप जिंकून भारतीयांची दिवाळी गोड करतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.