World Cup 2023: अहमदाबादमध्ये भारताची 'विजयाष्टमी', PAK गोलंदाजांना धुवत मिळवला सलग आठवा विजय

India vs Pakistan: वर्ल्ड कप २०२३मध्ये पाकिस्तानचा संघ आणि टीम इंडिया दुसऱ्यांदा आमने-सामने आले. या सामन्यात पाकिस्तानाचा दारुण पराभव झाला.
World Cup 2023
World Cup 2023Saam Tv
Published On

India vs Pakistan ICC World Cup 2023 :

वर्ल्डकपच्या महासंग्रामात भारत आणि पाकिस्तानचा संघ दुसऱ्यांदा आमने-सामने आले. या दुसऱ्या सामन्यातही पाकिस्तानाला पराभवाची चव चाखावी लागली. भारताने ७ गडी राखत वर्ल्डकप मधला आपला तिसरा सामना जिंकला. पाकिस्तानच्या संघाने दिलेलं माफक १९१ धावांचे आव्हान टीम इंडियाने सहज पार केलं. पाकिस्तानने दिलेलं आव्हान टीम इंडियाने ३०.३ षटकात पूर्ण केलं. (Latest News)

रोहित शर्माने ६३ चेंडूमध्ये ८६ धावा केल्या. यात ६ चौकार आणि ६ षटकाराचा समावेश आहे. तर श्रेयस अय्यरने नाबाद राहत ६२ चेंडूमध्ये ५३ धावा केल्या. शुबमन गिलने आणि विराट कोहलीने १६ धावा केल्या. दरम्यान भारताने पाकिस्तानच्या संघाला २०० धावांच्या आतमध्ये रोखलं. भारतीय संघाच्या सर्वच गोलंदाजांनी दमदार प्रदर्शन करत पाकिस्तानाच्या फलंदाजांना मोठी खेळी करू दिली नाही. पाकिस्तान संघाकडून फक्त बाबर आझमने सर्वाधिक ५० धावा केल्या. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने टॉस जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. रोहितचा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला आणि पाकच्या संघाला अवघ्या १९१ धावांमध्ये बाद केलं .

पाकिस्तान संघाने सावध सुरूवात केली होती, सलामीला आलेले अब्दुल्ला शफीक आणि इमाम-उल-हक यांनी सावध खेळ केला. मात्र त्यांना फार काही वेळ खेळपट्टीवर तग धरता आली नाही. मोहम्मद सिराज याने अब्दुल्ला शफीक याला २०धावांवर बाद केलं. त्यानंतर बाबर आझमने मैदानात आपले पाय घट्ट करत ५० धावा केल्या. मोहम्मद सिराज यांच्यानंतर हार्दिक पंड्या याने इमाम याला आऊट करत दुसरी विकेट घेतली. त्यानंतर मैदानात बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी डाव सावरायला सुरूवात केली. बाबरने आपलं अर्धशतक पूर्ण केलं.

मात्र ५० धावांच्या पुढे त्यांची गाडी धावू शकली नाही. बाबर आऊट झाल्यावर पाकिस्तान संघाच्या 162 ला 4 विकेटस् होत्या. त्यानंतर अवघ्या २९ धावांमध्ये सहा विकेट्स गेल्या. कुलदीप यादवने सौद शकील, इफ्तिखार अहमद यांना एकाच ओव्हरमध्ये मााघारी पाठवलं. त्यानंतर जसप्रीत बुमराहने शादाब खान आणि मोहम्मद रिझवान यांना बोल्ड करत माघारी पाठवलं. शेवटला पंड्याने एक जडेजाने दोन अशा एकूण पाचही गोलंदाजांनी दोन-दोन विकेट्स पाकिस्तानचा डाव १९१ धावांवरच गुंडाळला.

World Cup 2023
IND Vs PAK World Cup: 'कुंग फू' पांड्या झाला 'मांत्रिक' पांड्या; इमामच्या विकेट घेण्याआधी चेंडूसोबत पुटपुटला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com