IND vs PAK Match Rain Update : भारत-पाकिस्तान सामन्यावर पाऊस 'पाणी' फेरणार? सामना रद्द झाल्यास काय? वाचा सविस्तर

India vs Pakistan Weather Update: जाणून घ्या सामन्यावेळी कसं असेल हवामान?
ind vs pak
ind vs paksaam tv
Published On

IND vs PAK Match Rain Update:

विश्वचषक स्पर्धेतील हायव्होल्टेज असा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना उद्या १४ ऑक्टोबर पार पडणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघ सध्या जोरदार फॉर्मात आहेत. दोन्ही संघानी विश्वचषकात सलग दोन सामने जिंकले आहेत.

दोन्ही सघांची नजर आता विजयाची हॅटट्रिक करण्यावर असेल. दरम्यान हवामानाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. दोन्ही टीम आणि क्रिकेट रसिकांची नजर उद्याच्या हवामानानवर आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

भारत-पाकिस्तान सामन्याची अनेक दिवसांपासून चाहते प्रतीक्ष करत होते. जगातील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियमध्ये हा सामना होत असल्याने येथे एक लाखाहून अधिक प्रेक्षक उपस्थित राहू शकतात. भारतीय हवामान खात्याने (IMD) अहमदाबाद शहर आणि उत्तर गुजरातमध्ये सामन्यादरम्यान हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.

ind vs pak
IND vs PAK: डर का माहौल..! विराट अन् रोहितला रोखण्यासाठी PAK च्या गोलंदाजांनी केलाय हा खास प्लान

काय आहे हवामानाचा अंदाज?

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १४ आणि १५ ऑक्टोबर रोजी उत्तर गुजरात आणि अहमदाबादच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळू शकतात. मात्र जर पाऊस जास्त वेळ पडला तर सामन्यात व्यत्यय निर्माण होऊ शकतो. (Latest sports updates)

ind vs pak
IND vs PAK, Pitch Report: गोलंदाजांची कोंडी की फलंदाजांची चांदी? अहमदाबादची खेळपट्टी कोणासाठी ठरणार लकी? पाहा पिच रिपोर्ट

पावसामुळे सामना रद्द झाला तर?

हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज असल्याने सामना रद्द होईल, याची शक्यता कमी आहे. माक्षत्र पावसामुळे सामना रद्द झालाच तर भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. साखळी फेरीतील सामन्यासाठ राखीव दिवस नाही. बाद फेरीमध्ये सामन्यांसाठी राखीव दिवस आहेत. मात्र उद्याच्या सामन्यात पाऊस पडू नये, अशी इच्छा प्रत्येक क्रिकेट फॅनची आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com