IND vs PAK, Pitch Report: गोलंदाजांची कोंडी की फलंदाजांची चांदी? अहमदाबादची खेळपट्टी कोणासाठी ठरणार लकी? पाहा पिच रिपोर्ट

India vs Pakistan Pitch Report: अहमदाबादची खेळपट्टी कोणासाठी ठरणार फायदेशीर
IND vs PAK, Pitch Report
IND vs PAK, Pitch Reportsaam tv news
Published On

India vs Pakistan, Ahmedabad Pitch Report:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत भारतीय संघाने दमदार सुरूवात केली आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा ६ गडी राखून धुव्वा उडवला होता. तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने अफगाणिस्तान संघाचा ८ गडी राखून धुव्वा उडवला.

आता तिसऱ्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमने- सामने येणार आहे. हा सामना १४ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे.

दरम्यान अहमदाबादची खेळपट्टी फलंदाजांना साथ देणार की गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरणार? पाहा पिच रिपोर्ट.

नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी ही फलंदाजांसाठी स्वर्ग आहे. या मैदानावर फलंदाज धावांचा पाऊस पाडताना दिसून येतात.

चेंडू बॅटवर आल्याने गोलंदाजांची कोंडी तर फलंदाजांची चांदी होते. सुरूवातीला ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरते. तर सामना जसजसा पुढे जाईल, तशी फिरकी गोलंदाजांनाही मदत मिळते. (Latest sports updates)

IND vs PAK, Pitch Report
World Cup 2023 : भारत-अफगाणिस्तान सामन्यादरम्यान जोरदार राडा, मैदानातच भिडले फॅन्स, VIDEO Viral

आतापर्यंत या मैदानावर २९ सामने खेळले गेले आहेत. यादरम्यान प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने १६ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने १३ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.

त्यामुळे जो संघ नाणेफेक जिंकेल तो संघ प्रथम फलंदाजीचा निर्णय घेऊन मोठी धावसंख्या उभारण्याच्या प्रयत्नात असणार आहे. या स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांची सरासरी धावसंख्या २३७ तर दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघांची सरासरी धावसंख्या २०६ इतकी आहे.

IND vs PAK, Pitch Report
Pat Cummins Statement: ऑस्ट्रेलियाचं नेमकं गंडतय तरी कुंठ? पॅट कमिन्सने स्वत: केला खुलासा

या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com