World Cup 2023 : २०१९ च्या पराभवाची व्याजासह परतफेड! कॉनवे-रविंद्रच्या फटकेबाजीच्या जोरावर किविंचा एकहाती विजय

England vs New zealand: आयसीसी वर्ल्ड कपचा पहिला सामना न्यूझीलंडनं जिंकला आहे.
World Cup 2023 : २०१९ च्या पराभवाची व्याजासह परतफेड! कॉनवे-रविंद्रच्या फटकेबाजीच्या जोरावर किविंचा एकहाती विजय
Published On

England vs New zealand, world cup:

आयसीसी वर्ल्ड कपच्या महाकुंभ मेळ्याला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरुवात झाली. या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडचा ९ विकेट आणि ८२ चेंडू राखून पराभव केला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी आधी इंग्लंडच्या फलंदाजांना रोखले. त्यानंतर फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना जोरदार चोपलं. न्यूझीलंडकडून सलामी फलंदाज डेवेन कॉनवे याने दीडशतक ठोकले, तर युवा फलंदाज रचित रविंद्र याने वादळी शतक केलं. (Latest News)

या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंडच्या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. न्यूझीलंडचा हा निर्णय त्यांच्या पथ्यावर पडला. किवीच्या गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजाचे हात खोलण्याची मुभा दिली नाही. सुरुवातीला इंग्लंडच्या संघानं जोरात सुरुवात केली. वादळी सुरुवातीनंतर इंग्लंडची फलंदाजी मात्र ढेपाळली. इंग्लंडकडून जो रुटच्या चिवट फलंदाजी करत ७७ धावां केल्या. त्याच्या या खेळीमुळे इंग्लंडच्या संघानं २८३ धावांच्या आव्हान दिलं होतं. न्यूझीलंडकडून मॅट हेनरी याने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या.

विश्वचषक २०२३ च्या पहिल्याच सामन्यात इंग्लंडचा पराभव करत न्यूझीलंडनं २०१९ च्या पराभवाचा बदला घेतला. २०१९ च्या विश्वचषक फायनलमध्ये इंग्लंडनं न्यूझीलंडचा पराभव करत वर्ल्डकप जिंकला होता. २०१९ च्या विश्वचषकात इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना बरोबरीत सुटला होता. त्यामुळे सुपर ओव्हर घेण्यात आली.

पण सुपर ओव्हरही बरोबरीत सुटली होती. त्यानंतर इंग्लंड संघाचा जास्त चौकार असल्यामुळे त्यांना विजेते घोषीत करण्यात आलं. हाच पराभव न्यूझीलंडच्या प्रत्येकाच्या मनाला लागला होता. आज त्या पराभवाचा बदला किवींच्या संघानं घेतला.

इंग्लंडच्या संघानं दिलेल्या २८३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात अतिशय खराब झाली. संघाच्या अवघ्या दहा धावा झाल्या तेव्हा सलामी फलंदाज विल विंग शून्यावर तंबूत परतला होता. युवा फलंदाज रचित रविंद्र याने डेवेन कॉनवे याला चांगली साथ दिली. दोघांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. दोघांनी २७३ धावांची विक्रमी भागिदारी करत न्यूझीलंडला विजय मिळवून दिला.

World Cup 2023 : २०१९ च्या पराभवाची व्याजासह परतफेड! कॉनवे-रविंद्रच्या फटकेबाजीच्या जोरावर किविंचा एकहाती विजय
World Cup-2023: विश्वचषकाचा उद्घाटन सोहळा होणार नाही? : क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com