World Cup-2023: विश्वचषकाचा उद्घाटन सोहळा होणार नाही? : क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर

World Cup-2023: यंदा भारतात होणाऱ्या विश्वचषकाबाबत सर्वच भारतीयांसह जगभरातील क्रिकेट प्रेमींना उत्सुकता आहे. मात्र विश्वचषकाचा सोहळा होणार की नाही याबाबत सांशकता आहे.
World Cup-2023
World Cup-2023

World Cup 2023 Opening Ceremoney Latest Updates

यंदा भारतात होणाऱ्या विश्वचषकाबाबत सर्वच भारतीयांसह जगभरातील क्रिकेट प्रेमींना उत्सुकता आहे. मात्र विश्वचषकाचा सोहळा होणार की नाही याबाबत सांशकता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार यंदाचा उद्घाटन समारंभ आयोजित केला जाणार नाही. ४ ऑक्टोबरला सर्व संघांचे कर्णधार एकमेकांना भेटतील आणि वर्ल्ड कप ट्रॉफीसोबत फोटो सेशन होईल. यानंतर लेझर शो होईल. मात्र, उद्घाटन सोहळ्याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत घोषणा समोर आलेली नाही.

World Cup-2023
World Cup 2023: टीम इंडियाला मोठा झटका बसणार? वर्ल्डकपआधी असं कधीच घडलं नाही

5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाला सुरुवात होत आहे. त्याआधी ४ ऑक्टोबरला रंगतदार उद्घाटन सोहळा होणार असल्याची चर्चा होती. या सोहळ्यात बॉलीवूड स्टार्स रणवीर सिंग, तमन्ना भाटिया, अरिजित सिंग, श्रेया घोषाल आणि आशा भोसले यांच्या परफॉर्मन्सचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, बीसीसीआय १९ ऑक्टोबरला विश्वचषकाचा समारोप समारंभ आयोजित करू शकते, असेही बोलले जात आहे. 14 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत-पाक सामन्यापूर्वी काही खास कार्यक्रमांचे आयोजन केले जाऊ शकते, असे वृत्त आहे.

विश्वचषक 2023 मध्ये अनेक गोष्टींवरून वाद निर्माण झाला होता. सर्वप्रथम विश्वचषकाच्या वेळापत्रकावर टीका झाली. यानंतर स्थळावरूनही वाद निर्माण झाले होते. त्यांनतर वेळापत्रक आणि स्थळामध्येही काही बदल करण्यात आले. तिकीट घोटाळ्याच्या बातम्याही आल्या होत्या. आता या सगळ्याला सामोरे गेल्यावर सर्व काही सुरळीत झाल्याचे दिसत असताना, उद्घाटन सोहळ्याची योजना रद्द करण्यात आल्याचे अपडेट आल्याने चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडियावर बीसीसीआयवर टीकाही सुरू केली आहे.

World Cup-2023
World Cup 2023: वर्ल्डकपमध्ये कुणी घेतल्या सर्वाधिक विकेट्स? भारतीय गोलंदाज कितव्या स्थानी?

५ ऑक्टोबरला पहिला सामना

विश्वचषक 2023 चा सलामीचा सामना 5 ऑक्टोबर रोजी होणार आहे. गतविजेता इंग्लंड आणि गेल्या विश्वचषकातील उपविजेता न्यूझीलंड यांच्यात हा सामना होणार आहे. तर भारतीय संघ 8 ऑक्टोबरला पहिला सामना खेळणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com