Hardik Pandya- Natasha Stankovic: घटस्फोटानंतर हार्दिक खरंच बायकोला 70% प्रॉपर्टी देईल का? कायदा काय सांगतो?

Hardik Pandya- Natasha Stankovic Divorce: हार्दिक पंड्या आणि नताशा यांचा घटस्फोट होणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
Hardik Pandya- Natasha Stankovic: घटस्फोटानंतर हार्दिक खरंच बायकोला 70% प्रॉपर्टी देईल का? कायदा काय सांगतो?
hardik pandya natasha stankovicsaam tv

>प्रसाद जगताप

क्रिकेटर हार्दिक पंड्या आणि मॉडेल नताशा यांच्या नात्यात काही आलबेल नसल्याचे सांगण्यात येत आहे. हार्दिक आणि नताशा दोघे घटस्फोट घेणार आहेत अशा चर्चाही सुरु आहेत. या घटस्फोटानंतर हार्दिकला आपली ७० टक्के प्रॉपर्टी द्यावी लागेल असेही सांगण्यात येत आहे. पण खरंच ७० टक्के प्रॉपर्टी देण्याचा हा कायदा आहे तरी कुठला? आणि खरंच घटस्फोट झाल्यावर हार्दिकला आपली ७० टक्के प्रॉपर्टी द्यावी लागणार आहे का? जाणून घ्या.

एक जानेवारी २०२० ला हार्दिक पंड्या आणि नताशाची एंगेजमेंट झाली होती. त्यानंतर त्याच वर्षी जुलै महिन्यात नाताशाने बाळाला जन्म दिला. पुढे १४ फेब्रुवारीला २०२३ मध्ये नताशा आणि हार्दिकने राजस्थानमध्ये लग्न केलं. त्यांचा हा संसार सुरू होता. पण गेल्या काही दिवसांपासून नताशा आणि हार्दिकच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे का ?अशी चर्चा सुरू आहे. तसेच दोघे घटस्फोट घेतील अशा अफवाही पसरल्या आहेत. इतकंच नाही तर हार्दिक पंड्याला आपल्या एकूण प्रॉपर्टीपैकी ७० टक्के प्रॉपर्टी नताशाला द्यावी लागेल अशी चर्चाही आहे.

Hardik Pandya- Natasha Stankovic: घटस्फोटानंतर हार्दिक खरंच बायकोला 70% प्रॉपर्टी देईल का? कायदा काय सांगतो?
IPL 2024 Playing XI: IPL 2024 स्पर्धेतील सर्वोत्तम प्लेइंग 11! तुम्हाला काय वाटतं?

प्री नपच्युअल करारानुसार घटस्फोटानंतर पती पत्नीला आपली ७० टक्के प्रॉपर्टी द्यावी लागते. युरोपियन आणि अमेरिकन देशात हा करार लोकप्रिय आहे. विशेषतः सेलिब्रिटी आणि श्रीमंत लोक हा करार करून लग्न करतात. भारतात हिंदु धर्मीयांना विवाहासाठी हिंदु कोडबिल लागू होतो. तर मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मियांच्या लग्नासाठीही कायदे आहे. युरोप आणि अमेरिकेत जेव्हा या करारानुसार लग्न होतात, तेव्हा हे लग्न म्हणजे या जोडप्यांमधला करार मानला जातो. पण हिंदु कोडबिलनुसार लग्न हा करार नसून एक संस्कार मानला जातो. जर लग्न करणारे कपल वेगवेगळ्या धर्माचे असतील तर स्पेशल मॅरेज अॅक्टनुसार लग्न लावलं जातं. त्यात हे लग्न म्हणजे एक सिव्हिल कोन्ट्रॅक्ट मानलं जातं.

Hardik Pandya- Natasha Stankovic: घटस्फोटानंतर हार्दिक खरंच बायकोला 70% प्रॉपर्टी देईल का? कायदा काय सांगतो?
T20 World Cup 2024: IPL संपली आता रंगणार टी-२० वर्ल्डकपचा थरार! केव्हा होणार टीम इंडियाचे सामने?

हिंदु कोडबिलानुसार जर एका दाम्पत्याचं लग्न झालं तर त्यांना घटस्फोट घेण्याचाही अधिकार आहे. हा कायदा लिंगभेद करणारा नाही. हिंदु कोड बिलाच्या कलम २४ नुसार एका व्यक्तीला पोटगी मागण्याचा हक्क आहे. यात कलमानुसार फक्त पत्नीलाच पतीकडून पोटगी मिळते असा नियम नाही. पती पत्नीपैकी कोण कमावतं आणि कुणाला पोटगीची गरज आहे त्यांना कोर्टाच्या आदेशाने पोटगी दिली जाते. रुढार्थाने अनेकवेळेला पतीकडून पत्नीला पोटगी दिली जाते, पण गेल्या काही वर्षात नोकरदार असलेल्या पत्नीकडून बेरोजगार पतीलाही पोटगी देण्याचे आदेश कोर्टाने दिले होते.

आता प्रश्न निर्माण होतो की युरोप आणि अमेरिकेत लागू असलेला प्री नपच्युअल करार भारतात लागू होतो का? तर याचे उत्तर नाही असे आहे. भारतात लग्नाचे आणि घटस्फोटाचे नियम आहे. जर एखाद्या दाम्पत्याचा घटस्फोट झालाच तर तो या नियमांनुसार होतो. पोटगी आणि प्रॉपर्टीची विभागणीही भारतीय कायद्यांनुसारच होते.

सोशल मिडीयावर चर्चा होती की जर नताशा आणि हार्दिकचा घटस्फोट झालाच तर हार्दिकल आपली ७० टक्के प्रॉपर्टी नताशाला द्यावी लागेल. पण भारतीय कायद्यानुसार अशी कुठलीही तरतूद दिसत नाही. घटस्फोटंच्या चर्चांवर अजून तरी नताशा आणि हार्दिकने कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com