Sachin Tendulkar: ...म्हणून सचिनचा शेवटचा सामना वानखेडेवर खेळवला गेला, मास्टर-ब्लास्टरने सांगितला किस्सा

Sachin Tendulkar On His Last Test Match: भारतीय संघाचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकरचा शेवटचा सामना वानखेडे स्टेडियमवर का खेळवला गेला? जाणून घ्या कारण
Sachin Tendulkar: ...म्हणून सचिनचा शेवटचा सामना वानखेडेवर खेळवला गेला, मास्टर-ब्लास्टरने सांगितला किस्सा
sachin tendulkarsaam tv
Published On

सचिन तेंडुलकर हे क्रिकेट विश्वातील असं नाव आहे, ज्याने भारतात क्रिकेटची क्रेझ वाढवली. सचिन तेंडुलकरची एक झलक पाहण्यासाठी क्रिकेट फॅन्स तासनतास रांगेत उभे राहायचे. त्याची क्रेझ आजही कमी झालेली नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निवृत्त होऊन १२ वर्षे उलटली आहेत. मात्र आजही सचिनचा फॅनबेस तसाच आहे.

जगात सर्वाधिक धावा करणारा, सर्वाधिक शतक झळकावण्याचा रेकॉर्ड हा सचिनच्या नावावर आहे. त्यामुळे सचिनला गॉड ऑफ क्रिकेट असं म्हटलं जातं. २०१३ मध्ये सचिन भारतीय कसोटी संघासाठी शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात आला होता. आता सचिनने शेवटच्या कसोटी सामन्यातील एक किस्सा सांगितला आहे.

Sachin Tendulkar: ...म्हणून सचिनचा शेवटचा सामना वानखेडेवर खेळवला गेला, मास्टर-ब्लास्टरने सांगितला किस्सा
Rohit Sharma: 'चॅम्पियन्स ट्रॉफी वानखेडेवरच येणार..', रोहित शर्माने आधीच सांगितला ९ मार्च नंतरचा प्लान

सचिन १६ नोव्हेंबर २०१३ ला आपल्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. संपूर्ण क्रिकेट विश्वाला माहीत आहे की, सचिन तेंडुलकरने शेवटचा सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला होता. पण त्याने शेवटचा सामना खेळण्यासाठी हेच मैदान का निवडलं? हे खूप कमी लोकांना माहीत आहे. वानखेडे स्टेडियमला ५० वर्षे पूर्ण झाल्यानंतर सचिनने याचा खुलासा केला आहे.

Sachin Tendulkar: ...म्हणून सचिनचा शेवटचा सामना वानखेडेवर खेळवला गेला, मास्टर-ब्लास्टरने सांगितला किस्सा
Rohit Sharma: मी प्रयत्न करेन, 140 कोटी लोकांच्या अपेक्षा...; चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी रोहित शर्माने चाहत्यांना दिलं वचन

काय आहे कारण?

वानखेडे स्टेडियमला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. या खास क्षणी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुंबई क्रिकेटमधील दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती. त्यावेळी सचिनने शेवटच्या सामन्याबाबत खुलासा केला. सचिन म्हणाला, ' माझ्या शेवटच्या कसोटी मालिकेची घोषणा होण्यापूर्वी मी बीसीसीआयला कॉल केला आणि विनंती केली की, माझा शेवटचा कसोटी सामना वानखेडे स्टेडियमवर व्हायला हवा. '

सचिन म्हणाला, ' मी जवळजवळ ३० वर्ष क्रिकेट खेळलो, भारतीय संघासाठी मला २४ वर्ष क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. मात्र माझ्या आईने मला कधीच खेळताना पाहिलं नव्हतं. ज्यावेळी माझा शेवटचा सामना होता, त्यावेळी माझ्या आईची तबीयत ठीक नव्हती. त्यामुळे ती वानखेडे सोडून इतर कुठल्याही स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी जाऊ शकत नव्हती. मला असं वाटत होतं की, तिला ही कळावं की मी गेली २४ वर्षे इतक्या ठिकाणी खेळण्यासाठी का जायचो. बीसीसीआयने माझी मागणी विनम्रपणे मान्य केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com