Pant vs Litton Das: भाई, मला का मारतोय? भर मैदानात पंत-लिटन दासमध्ये राडा, नेमकं काय घडलं, पाहा Video

Pant vs Litton Das: पहिल्या टेस्ट सामन्यात ऋषभ पंत आणि यशस्वी जयस्वाल यांनी डाव सावरला आहे. मात्र यामध्ये पंत आणि लिटन दासमध्ये भांडण झाल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
Pant vs Litton Das
Pant vs Litton Dassaam tv
Published On

चेन्नईच्या मैदानावर भारत विरूद्ध बांगलादेश यांच्यामध्ये सध्या पहिला टेस्ट सामना खेळवला जातोय. या सामन्यात बांगलादेशाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी टीम इंडियाची फलंदाजी गडगडली. मात्र ऋषभ पंत आणि यशस्वी जयस्वाल यांनी डाव सावरला. डिसेंबर २०२२ मधील अपघातानंतर Rishabh Pant टेस्ट क्रिकेटमध्ये परतला असून विरूद्ध टीमच्या खेळाडूंसोबत त्याची शा‍ब्दिक बाचाबाची झाली आहे.

लाईव्ह सामन्यात पंतने घातला राडा?

६३४ दिवसानंतर ऋषभ पंत टेस्ट सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. यावेळी बांगलादेशच्या खेळाडूंकडून ऋषभला डिवचण्याचा प्रयत्न होताना दिसला. बांगलादेशाकडून विकेटकीपर लिटन दास ( Litton Das) आणि ऋषभ पंतमध्ये काहीसा वाद झाल्याचं दिसून आलं. याचा व्हिडीओ देखील आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पंत-लिटन दासमध्ये नेमकं काय घडलं?

टीम इंडियाचा डाव सावरताना पंतने फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली. मात्र यावेळी लिटन दासच्या एका कृत्यामुळे पंत चांगलाच संतापला. दासने बॉल ऋषभच्या दिशेने फेकल्याने या दोघांमध्ये शा‍ब्दिक बाचाबाची झाली. यावेळी पंतने, बॉल त्याच्याकडे फेक ना भाई, मला का मारतोयस, असं कडक शब्दामध्ये दासला सुनावलं.

टीम इंडिया फलंदाजी गडगडली

पहिल्याच टेस्ट सामन्यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा टॉस गमावला. यावेळी टीम इंडियाला पहिल्यांदा फलंदाजीचं आमंत्रण देण्यात आलं. मात्र या सामन्यात भारताचे टॉप ऑर्डरचे फलंदाज फेल झाल्याचं पाहायला मिळालं. कर्णधार रोहित शर्मा ( ६ ), शुभमन गिल ( ०) आणि विराट कोहली ( ६) हे २४ वर्षीय गोलंदाज हसन महमूदच्या ( Hasan Mahmud) गोलंदाजीवर माघारी परतले. मात्र त्यानंतर पंतने डाव सावरला आणि टीम इंडियासाठी चांगला खेळ केला.

कशी आहे टीम इंडियाची प्लेईंग ११?

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप, मोहम्मद सिराज.

Pant vs Litton Das
IND vs BAN: बांगलादेशाने जिंकला टॉस, भारत करणार फलंदाजी; चेन्नईचं पीच कोणाला ठरणार फायदेशीर?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com