
विश्वविजेती कर्णधार मेग लेनिंगच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाने वुमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेत दमदार कामगिरी केली. दिल्लीला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. मात्र अंतिम सामन्यात दिल्लीवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने शानदार विजय मिळवला. यासह पहिल्यांदाच जेतेपदावर नाव कोरलं. दिल्लीची एक्स्प्रेस सुस्साट असताना श्रेयंका पाटीलने दिल्लीच्या गाडीला ब्रेक लावला. दरम्यान श्रेयंका पाटील आहे तरी कोण? जाणून घ्या.
या सामन्यात प्रथम गोलंदाजी करत असलेल्या दिल्ली कॅपिटल्सकडून श्रेयंका पाटीलने ३.३ षटकात अवघ्या १२ धावा खर्च करत ४ गडी बाद केले. या दमदार कामगिरीच्या बळावर तिने दिल्लीच्या फलंदाजीक्रमाचं कंबरडं मोडलं. तिच्या या कामगिरीमुळे दिल्लीचा डाव ११३ धावांवर संपुष्टात आला.
श्रेयंका पाटीलबद्दल बोलायचं झालं तर तिचा जन्म ३१ जुलै २००२ रोजी कर्नाटकातील बंगळुरु येथे झाला. विराटला आपला आदर्श मानणाऱ्या श्रेयंकाने वयाच्या ९ व्या वर्षापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली. फायनलमध्ये एक वेळ अशी होती जेव्हा दिल्लीच्या फलंदाजांनी संघाला आक्रमक सुरुवात करुन दिली. संघाची मोठ्या धावसंख्येच्या दिशेने आगेकूच सुरु होती. त्यावेळी श्रेयंका पाटीलने ३ फलंदाजांना बाद करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला कमबॅक करुन दिलं. या सामन्यात श्रेयंकाने दिल्लीच्या फलंदाजांना न पचणारं दु:ख दिलं आहे. (Cricket news in marathi)
ऑफ स्पिन गोलंदाजी करणाऱ्या या गोलंदाजाने २ वनडे सामन्यांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. यादरम्यान तिने ४ गडी बाद केले आहेत. तर ६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ८ गडी बाद केले आहेत. ती परदेशी क्रिकेट लीग स्पर्धेचा कॉन्ट्रॅक्ट मिळवणारी पहिलीच अनकॅप्ड भारतीय खेळाडू आहे. गतवर्षी झालेल्या कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेत तिला गयाना अॅमेझॉन वॉरियर्स संघाने आपल्या संघात स्थान दिलं होतं. आता तिने ४ गडी बाद करत दिल्ली कॅपिटल्स संघाला पराभूत करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.
श्रेयंका पाटीलने या स्पर्धेत सर्वाधिक १३ गडी बाद केले. या कामगिरीच्या बळावर ती पर्पल कॅपची मानकरी ठरली आहे. पर्यल कॅपसह तिला ५ लाख रुपये देखील मिळाले आहेत. यासह तिला इमर्जिंग प्लेअरचा देखील पुरस्कार दिला गेला आहे. त्यासाठी तिला अतिरक्त ५ लाख रुपये दिले गेले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.