मराठमोळ्या सचिनने पॅरिसमध्ये इतिहास घडवला आहे. सांगलीच्या सचिन सरजेराव खिलारीने पुरुषांच्या F46 कॅटेगरीतील गोळाफेक प्रकारात त्यानेत रौप्य पदकाला गवसणी घातली आहे. त्याने आतापर्यंत घेतलेली मेहनत, जिद्द आणि कष्टाचं फळ त्याला मिळालंय.
फायनलमध्ये त्याला हवी तशी सुरुवात करता आली नाही. पहिल्या थ्रो मध्ये त्याला १५ मीटरपर्यंत देखील पोहोचता आलं नाही. पुढच्याच थ्रो मध्ये त्याने १६.३२ मीटर थ्रो केला. हा त्याचा फायनलमधील सर्वोत्तम थ्रो ठरला.
त्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात त्याला १६.१५, चौथ्या प्रयत्नात त्याला १६.३१, पाचव्या प्रयत्नात १६.०३ आणि शेवटच्या प्रयत्नात १५.९५ मीटर लांब थ्रो केला. फायनलमध्ये अव्वल स्थानी राहिलेल्या ग्रेग स्टीवर्टने १६.३४ मीटर लांब गोळा फेकत सुवर्णपदकांनी हुकलं. त्यामुळे सचिनचं सुवर्णपदक थोडक्यात हुकलं. १९८४ नंतर भारताला गोळाफेकमध्ये पहिलंच पदक मिळालं आहे.
सचिन सरजेराव खिलारी सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात राहतो. बालपणी बाईकवरुन जात असताना त्याचा अपघात झाला होता. या अपघातानंतर त्याचे हाड मोडले. प्रचंड वेदना आणि दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला बराच वेळ लागला.
ज्यामुळे गँगरीन झाला आणि त्यानंतर त्याच्या डाव्या हाताच्या हालचालींवर मर्यादा आल्या. प्रचंड अडचणी होत्या. मात्र तो खचून गेला नाही. त्याचं शिक्षण पुण्यातील इंदिज कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमधून पूर्ण केलं. या कॉलेजमधून मॅकेनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असताना त्याची खेळाकडे ओढ निर्माण झाली.
सुरुवातीला त्याला भालाफेक खेळाची आवड होती. परंतु एका स्पर्धेदरम्यान त्याच्या खांद्याला दुखापत झाली. त्यामुळे त्याने भालाफेक सोडून गोळा फेकायला सुरुवात केली. इतके अडथळे येऊनही तो खचून गेला नाही.
सचिन खिलारीच्या वडिलांबद्दल बोलायचं झालं,सरजेराव रंगनाथ खिलारी हे एक कृषितज्ञ आहेत आणि त्यांना महाराष्ट्र कृषी भूषण पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आलं आहे. सचिन खिलारी पेश्याने इंजिनिअर आहे.
गेल्या वर्षी त्याने २०२३ वर्ल्ड पॅरा अॅथलेटीक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत पुरुषांच्या एफ46 गोळाफेक प्रकारात सुवर्ण पदकाला गवसणी घातली होती. या स्पर्धेतील फायनलमध्ये त्याने १६.२१ मीटर लांब थ्रो करत सुवर्ण पदक पटकावलं होतं.
पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ स्पर्धेत भारतीय खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. भारतीय खेळाडूंनी अॅथलेटीक्स क्रीडा प्रकारात आतापर्यंत ११ पदकं जिंकली आहेत. तर एकूण २० पदकं जिंकली आहेत.
गेल्या ६४ वर्षांत ही भारतीय खेळाडूंनी अॅथलेटीक्समध्ये केलेली सर्वोत्तम कामगिरी आहे. भारतीय खेळाडूंनी शूटींग, तिरंदाजीतही पदकं जिंकली आहेत. मात्र अॅथलेटीक्समध्ये पटकावलेल्या पदकांची संख्या अधिक आहे. या आकडेवारीत आणखी भर पडू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.