HBD MS Dhoni: धोनीला ग्लोबल ब्रँड बनवणाऱ्या मित्राची कहाणी

Who Is Arun Pandey: धोनीला ग्लोबल ब्रँड बनवण्यात अरुण पांडे यांचा मोठा हात आहे. कोण आहेत अरुण पांडे? जाणून घ्या.
ms dhoni with arun pandey
ms dhoni with arun pandeysaam tv
Published On

Happy Birthday MS Dhoni: रांचीसारख्या छोट्या शहरातून एक खेळाडू येतो आणि पुढे क्रिकेट विश्वावर राज्य करतो. सुरुवातील संघात स्थान मिळणंही कठीण होतं. मात्र पुढे जाऊन हाच खेळाडू भारताचा कर्णधार झाला आणि भारताला आयसीसीच्या ३ ट्रॉफी देखील जिंकून दिल्या. आम्ही कोणाबद्दल हे तुम्हाला कळालंच असेल.

आम्ही बोलतोय भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीबद्दल. एमएस धोनी आपला ४२ वा वाढदिवस साजरा करतोय. २००४ मध्ये पदार्पण करणाऱ्या धोनीने भारतीय संघाला २००७ टी -२० वर्ल्डकप, २०११ वनडे वर्ल्डकप आणि २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत विजय विजय मिळवून दिला होता.

ms dhoni with arun pandey
Happy Birthday MS Dhoni: MS Dhoni च्या क्रिकेट कारकिर्दीतील Top 5 बेस्ट Innings,जे क्रिकेट चाहते कधीच विसरू शकणार नाहीत

एमएस धोनीने जेव्हा भारतीय संघाला २००७ टी -२० वर्ल्डकप जिंकून दिला होता, त्यावेळी तो ब्रँड म्हणून जगासमोर आला होता. मात्र या ब्रँडला ग्लोबल ब्रँड बनवण्यात अरुण पांडे यांचा मोठा हात आहे. कोण आहेत अरुण पांडे? जाणून घ्या.

कोण आहे अरुण पांडे?

अरुण पांडे उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये राहतात. ४४ वर्षीय अरुण पांडे देखील क्रिकेटपटू आहेत. या अष्टपैलू खेळाडूने देखील भारतीय संघासाठी खेळण्याचं स्वप्न पाहिलं होतं. त्यांनी क्रिकेटचे प्रशिक्षण घेतलं. शालेय आणि कॉलेज स्तरावर त्यांनी आपल्या संघाचं प्रतिनिधित्व केलं. त्यांना प्रथम श्रेणी क्रिकेट देखील खेळण्याची संधी मिळाली होती. मात्र काही चमकदार कामगिरी करता आली नाही. त्यानंतर त्यांना जाणवलं की, आपलं क्रिकेटमध्ये काही होणार नाही.

टी -सिरीज नौकरी अन् एमएस धोनीसोबत मैत्री..

क्रिकेटच्या मैदानावर फ्लॉप ठरलेल्या अरुण पांडेला जाणवलं होतं की, आपलं क्रिकेटमध्ये काही होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी क्रिकेटला वेगळ्या नजरेने पाहायला सुरुवात केली. दिल्ल्लीत असताना त्यांनी टी -सिरीझसोबत काम केलं. सुरुवातीला जेव्हा एमएस धोनी संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करत होता. ठिकठिकाणी जाऊन ट्रायल्स देत होता, त्यावेळी एमएस धोनी आणि अरुणची ओळख झाली होती. युपी- बिहारच्या सामन्यादरम्यान दोघांची भेट झाली, दोघांमध्ये चर्चा देखील झाली होती. त्यानंतर दोघेही खूप चांगले मित्र झाले होते. (Latest sports updates)

ms dhoni with arun pandey
Happy Birthday MS Dhoni: धोनी मोठे केसं का ठेवायचा? जाणून घ्या MS Dhoni बद्दल माहित नसलेल्या खास गोष्टी

अरुणला मिळाली धोनीची साथ..

धोनी जेव्हा अडचणीत होता त्यावेळी अरुण पांडेने धोनीला साथ दिली होती. भारतीय संघाने २००७ चा टी -२० वर्ल्डकप जिंकला. त्यानंतर एमएस धोनी हे नाव प्रचंड चर्चेत आलं. धोनीला स्वतःचा ब्रँड बनवण्यासाठी मॅनेजरची गरज होती.

अरुणला टी-सिरीझचा चांगलाच अनुभव होता. त्यावेळी धोनीने अरुण पांडेची मॅनेजर म्हणून नेमणूक केली. धोनीने आपल्या मित्राला मॅनेजर म्हणून नेमलं होतं.

धोनीची सुरुवात कोट्यावधीने झाली. मात्र बघता बघता त्याची ब्रँडव्हॅल्यू इतकी वाढली की, धोनी आता ग्लोबल ब्रँड बनला आहे. अरुण पांडे मॅनेजर बनताच धोनीची ब्रँडव्हॅल्यू २०० कोटींच्या पार पोहोचली होती. गेल्या १५ वर्षांपासून अरुण पांडे आणि एमएस धोनी एकत्र आहेत. अरुण पांडे यांची रिती स्पोर्ट्स केवळ एमएस धोनी नव्हे तर सुरेश रैना आणि सायना नेहवाल सारख्या खेळाडूंना मॅनेज करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com