विराट कोहली आणि अनुष्का शर्माने 11 डिसेंबर 2017 मध्ये लग्न केलं. इटलीत दोघांनी लग्नगाठ बांधली. 2013 मध्ये दोघांची एका जाहिरातीच्या शुटींगदरम्यान भेट झाली होती. अनुष्काने 19 पेक्षा जास्त फिल्ममध्ये काम केले आहे. दोघांकडे कोट्यवधींची संपत्ती आहे.
जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये विराट कोहलीच्या नावाचा समावेश होतो. त्याची मुंबई, दिल्ली आणि इतर ठिकाणी मालमत्ता आहे. विराट कोहलीची एकूण संपत्ती 127 दशलक्ष डॉलर्स आहे. म्हणजे 1046 कोटी रुपये आहे. विराटचे मुंबई आणि दिल्लीत स्वतःचे आलिशान बंगले आहेत. त्याच्या या बंगल्याची किंमत काही कोटी रुपये आहे. विराट कोहलीने अलिबागमध्ये देखील बंगला विकत घेतला आहे. त्याचे व्हिडीओ सोशल मीडिवर व्हायरल झाले आहे. विराटने 2015 मध्ये डीएलएफ फेज 1, गुडगाव येथे 80 कोटींचा 4500 स्क्वेअर फुटांचा बंगला खरेदी केला होता.
तर 2016 मध्ये त्याने मुंबईतील वरळी येथे 35 व्या मजल्यावर 7000 स्क्वेअर फूट एरियाचा फ्लॅट घेतला होता. विराट हा फक्त क्रिकेटमधूनच पैसे कमवत नाही. तो अनेक जाहिराती, विविध कंपन्यांचा ब्रँड अँबेसेडर आहे. तर अनेक व्यवसायांमध्येही त्याने गुंतवणुक केली आहे. विराट कोहली विविध उद्योगांमधील 20 हून अधिक ब्रँडशी जोडला गेलेला आहे.
कोहलीने Audi, Puma, Myntra आणि Manyavar यासह 20 हून अधिक ब्रँडसोबत एंडोर्समेंट करार केले आहेत. ब्रँड एंडोर्समेंटसाठी कोहली 7.5 ते 10 कोटी रुपये घेतो. विराट कोहलीचे सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहे. इंस्टाग्रामवर एका पोस्टमधून तो $1,088,000 कमावतो. म्हणजेच भारतीय 89,216,000 रुपये कमावतो.
विराट कोहली कारचा देखील चाहता आहे. त्याच्याकडे ऑडी, बेंटले आणि रेंज रोव्हर सारख्या लक्झरी कार आहे. तर त्याच्याकडे महागडेरोलेक्स आणि पाटेक फिलिप सारख्या ब्रँडची घडाळे आहे.
विराट कोहलीची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माकडे 255 कोटींची संपत्ती आहे. ती एका चित्रपटासाठी 10 ते 15 कोटी रुपये घेते. याशिवाय अनुष्का शर्मा जाहिरात आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून पैशांची कमाई करते. अनुष्का एका जाहिरातीसाठी 3 कोटी रुपये घेत असल्याची माहिती आहे. विराट कोहली प्रमाणे अनुष्काकडे देखील महागड्या अलिशान कार आहे. तिचाकडे रेंज रोव्हर वोग, ऑडी Q8, BMW 7 सीरीज कार आहे. या सर्व कारची किंमत 10 कोटी रुपये आहे. तसंच अलिबागमध्ये 19.24 कोटी रुपयांचे फार्महाऊस आहे. याशिवाय अनुष्का शर्मा NUSH कपड्यांच्या ब्रँड देखील मालक आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.