
Virender Sehwag : भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवाग हा त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे प्रसिद्ध होता. त्याने २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केले होते.
आता निवृत्त होऊन वर्षे झाली असली तरीदेखील तो काही ना काही कारणामुळे चर्चेत येत असतो. त्याचे मजेशीर किस्से आणि ट्वीट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असतात.
काही दिवसांपुर्वी दिलेल्या मुलाखतीत बोलताना सेहवागने अनेक खुलासे केले आहेत. त्याने अनेक रोमांचक किस्से सांगितले आहेत. त्यातला एक रोमांचक किस्सा म्हणजे जेव्हा वीरेंद्र सेहवाग पाकिस्तानला गेला होता. या दौऱ्यावर तो फ्रीमध्ये शॉपिंग करून आला होता.
जेव्हा वीरेंद्र सेहवागने फ्रीमध्ये केली शॉपिंग..
तर झाले असे की, २००४ साली भारतीय संघ वनडे मालिका खेळण्यासाठी पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. ही मालिका झाल्यानंतर सेहवाग बोहल्यावर चढणार होता. त्यामुळे मालिका सुरू असताना त्याने शॉपिंगला जायंच ठरवलं होतं. शॉपिंग करण्यासाठी त्याने थेट मुलतानमधील मार्केट गाठलं होतं. (Latest sports updates)
या प्रसंगाविषयी बोलताना सेहवाग म्हणाला, “तो दौरा आम्हा सगळ्यांसाठीच महत्त्वाचा होता कारण आम्ही खूप दिवसांनंतर पाकिस्तानमध्ये खेळायला गेलो होतो. त्यावेळी पाकिस्तानी लोकांनी तिथल्या चाहत्यांनी आम्हाला भरपूर प्रेम दिलं. तिथल्या राष्ट्रपतींना ज्यापद्धतीचं संरक्षण दिलं जातं तसंच आम्हाला दिलं होतं. पाकिस्तान दौऱ्यानंतर माझं लग्न होतं तर मला घरच्या काही महिलांसाठी जोडे, कपडे खरेदी करायचे होते. तेव्हा मी माझ्याबरोबर सेक्युरिटी घेऊन मार्केटमध्ये गेलो आणि शॉपिंग केलं, जेव्हा मी पैसे देऊ लागलो तेव्हा तिथल्या माणसाने माझ्याकडून पैसे घेतले नाहीत, ते म्हणाले तुम्ही आमचे पाहुणे आहात तुमच्याकडून कसे पैसे घेणार.”
पुढे सेहवाग म्हणाला, “मी त्यांना बोललो की मला एखाद दूसरा जोड फ्रीमध्ये द्या, पण मला ३० ते ३५ जोड घ्यायचे आहेत. तरी त्यांनी माझ्याकडून एक पैसाही घेतला नाही. आज जरी दोन देश वेगळे असले, त्यांचं राजकारण वेगळं असलं तरी आजही दोन्ही देशातील देशवासीयांमध्ये आपल्याला प्रेम बघायला मिळतं.”
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.