World Cup 1983: BCCI कडे वर्ल्ड कप जिंकलेल्या खेळाडूंना द्यायलाही पैसे नव्हते; लतादीदींनी केली होती मोठी मदत..

World Cup 1983 Lata Mangeshkar: त्यावेळी बीसीसीआयकडे खेळाडूंना बक्षीस म्हणून देण्यासाठी देखील पैसे नव्हते.
1983 wc
1983 wcsaam tv

On This Day: वर्तमान भारतीय संघ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात मजबूत संघांपैकी एक आहे. आयसीसीच्या स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळत असतो. मात्र १९७०-८० च्या दशकात असं काहीच नव्हतं.

त्यावेळी वेस्ट इंडिज आणि इंग्लंड सारखे संघ बलाढ्य संघांपैकी एक होते. असं असताना देखील कपिल देवच्या नेतृत्वखाली खेळणारा भारतीय संघ १९८३ वनडे वर्ल्ड कपसाठी इंग्लडला गेला. या संघाने अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवला आणि पहिल्यांदाच वनडे विश्वचषक जिंकून जगाला दाखवून दिल की, हम भी किसी से कम नही. (1983 World Cup)

मात्र ही ऐतिहासिक कामगिरी करून भारतीय खेळाडू जेव्हा मायदेशी परतले. त्यावेळी बीसीसीआयकडे खेळाडूंना बक्षीस म्हणून देण्यासाठी देखील पैसे नव्हते.

1983 wc
Team India Squad: चेतेश्वर पुजारा बाहेर! तर IPL गाजवणाऱ्या 'या' २ खेळाडूंना थेट टीम इंडियात संधी

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ( बीसीसीआय) हा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डपैकी एक आहे. भारतीय संघात खेळणाऱ्या खेळाडूंना कोट्यवधी रुपये मानधन म्हणून दिले जातात. तर ट्रॉफी जिंकल्यानंतर खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव केला जातो.

मात्र भारतीय संघाने जेव्हा पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला होता. त्यावेळी विजेत्या संघाला देण्यासाठी बीसीसीआयकडे पैसेच नव्हते. त्यावेळी दिवंगत गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी फ्रीमध्ये कॉन्सर्ट करून विश्वविजेत्या खेळाडूंसाठी बक्षिसाची रक्कम जमवली होती. (Latest sports updates)

1983 wc
Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकर अन् जेमिमा यांच्यात आहे खास नातं; स्वत: पोस्ट शेअर करत केला खुलासा

बीसीसीआयने लता मंगेशकरांकडे मागितली होती मदत..

भारतीय संघाने १९८३ मध्ये असं काहीतरी करून दाखवलं होतं जे यापूर्वी कोणालाच जमलं नव्हतं. ही कामगिरी केल्यानंतर बीसीसीआयला खेळाडूंना बक्षिस द्यायचं होतं. मात्र पैसे नव्हते. अशा स्तिथीत बीसीसीआयचे अध्यक्ष एनकेपी साळवे यांनी लता मंगेशकरांकडे मदत मागितली होती.

लता मंगेशकर मदत करण्यासाठी तयार देखील झाल्या होत्या. ठरल्याप्रमाणे दिल्लीतील इंदिरा गांधी इंडोर स्टेडियममध्ये लता मंगेशकर यांचा कॉन्सर्ट पार पडला होता. हा कॉन्सर्ट सुपरहिट झाला आणि २० लाख रुपयांची कमाई झाली. या रकमेतून खेळाडूंना प्रत्येकी १-१ लाख रुपये रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आले होते.

या कॉन्सर्टसाठी त्यांनी बीसीसीआयकडे एकही रुपया घेतला नव्हता. याची दखल घेत बीसीसीआयने असा प्रस्ताव मांडला होता की, जोपर्यंत लता मंगेशकर जिवंत आहेत, तोपर्यंत स्टेडियममध्ये एक सिट त्यांच्या नावाने रिजर्व्ह ठेवली जाईल.

या कॉन्सर्टमध्ये लता मंगेशकर यांनी अनेक गाणी गायली होती. ज्यात भारत विश्व विजेता हे गाणं सुपरहिट ठरलं होतं. तसेच वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय संघाने अंतिम सामन्यात वेस्ट इंडिज संघावर ४३ धावांनी विजय मिळवला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com