
आयपीएल २०२५ मध्ये आज स्पर्धेतील ५० वा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात आयपीएलमध्ये पाच वेळा विजेची टीम मुंबई इंडियन्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये हा सामना रंगणार आहे. जयपुरच्या सवाई मानसिंह स्टेडियममध्ये हा सामना रंगणार असून प्लेऑफ गाठण्यासाठी मुंबईकरीता हा सामना खूप महत्त्वाचा मानला जातोय.
हा सामना खूप रंजक होण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे दोन्ही टीम्स चांगल्या लयीत दिसणार आहेत. राजस्थान रॉयल्सने गेल्या सामन्यामध्ये गुजरातला ८ विकेट्सने पराभूत केलं होतं. तर यानंतर मुंबईने सलग ५ सामने जिंकले आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार हे पाहावं लागणार आहे.
राजस्थान टीमसाठी दोन्ही ओपनर यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी यांनी गुजरातविरूद्ध खेळताना चांगली कामगिरी केली होती. या सामन्यात वैभव सूर्यवंशीने तुफान फलंदाजी करत आपलं नाणं खणखणीत वाजवलंय. तर दुसरीकडे यशस्वी जयस्वाल देखील चांगल्या लयीत आहे.
मुंबईबद्दल बोललं तर या टीमची फलंदाजी तगडी आहे. रोहित शर्मा, रायन रिकेल्टन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या असे फलंदाज या टीमकडे आहेत. राजस्थानकडे चांगले गोलंदाज आहेत ज्यांच्यासाठी मुंबईच्या फलंदाजांना रोखणं हे मोठं आव्हान असणार आहे. जर मुंबईची फलंदाजी चांगली झाली तर राजस्थानसाठी समस्या निर्माण होऊ शकते.
या सामन्यात सर्वांचं लक्ष १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीकडे असणार आहे. वैभव जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट आणि दीपक चहर या वेगवान गोलंदाजांचा कसा सामना करतो हे पाहावं लागणार आहे. वैभवने गुजरातच्या मोहम्मद सिराज, इशांत शर्मा, प्रसिद्ध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर, रशीद खान, करीम जन्नत या सर्व गोलंदाजांना धु-धु धुतलं होतं. आता मुंबईविरुद्ध तो या टीमच्या वेगवान गोलंदाजांचा कसा सामना करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश तिक्षाना, संदीप शर्मा, युधवीर सिंग चरक.
रायन रिकेल्टन (विकेटकीपर), रोहित शर्मा, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, कॉर्बिन बॉश, ट्रेंट बोल्ट, दीपक चहर, कर्ण शर्मा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.