WI vs AFG, Highlights: वेस्टइंडिजचा विजयी चौकार! शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानवर मिळवला मोठा विजय

West Indies vs Afghanistan, Match Highlights: वेस्टइंडिजने शानदार खेळ करत अफगाणिस्तानवर मोठा विजय मिळवला आहे.
WI vs AFG, Highlights: वेस्टइंडिजचा विजयी चौकार! शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानवर मिळवला मोठा विजय
WI vs AFGtwitter
Published On

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील साखळी फेरीतील सामने समाप्त झाले आहेत. या सामन्यात यजमान वेस्टइंडिज आणि अफगाणिस्तान हे दोन्ही संघ सामने आले होते. या सामन्यात वेस्टइंडिजने पाहुण्या अफगाणिस्तान संघाचा चांगलाच समाचार घेतला. या सामन्यात वेस्टइंडिजने २१८ धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा ११४ धावांवर खुर्दा पाडला आणि १०४ धावांनी विजय मिळवला.

या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय पूर्णपणे चुकला. कारण प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या वेस्टइंडिजच्या फलंदाजांनी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची पळता भूई थोडी केली. निकोलस पूरन तर अफगाणिस्तानच्या गोलंदाजांवर तुटून पडला.

WI vs AFG, Highlights: वेस्टइंडिजचा विजयी चौकार! शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानवर मिळवला मोठा विजय
Nicholas Pooran, WI vs AFG: पूरनच्या वादळात अफगाण गोलंदाजांची धुळधाण! एकाच षटकात चोपल्या 36 धावा; पाहा VIDEO

त्याने या डावातील चौथ्या षटकात तब्बल ३६ धावा चोपल्या. त्यने ५४ चेंडूंचा सामना करत ६ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने ९८ धावांची खेळी केली. त्याला शतक झळकावण्यासाठी अवघ्या २ धावा हव्या असताना तो धावबाद होऊन माघारी परतला. तर जॉन्सन चार्ल्सने ८ चौकारांच्या साहाय्याने ४३ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर वेस्टइंडिजने २० षटकअखेर ५ गडी बाद २१८ धावा केल्या.

WI vs AFG, Highlights: वेस्टइंडिजचा विजयी चौकार! शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानवर मिळवला मोठा विजय
IND vs AFG, Super 8: भारत- अफगाणिस्तानमध्ये रंगणार सुपर ८ चा थरार! कुठे अन् केव्हा पाहता येणार?

अफगाणिस्तानला हा सामना जिंकण्यासाठी २१९ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानकडून सलामीला आलेल्या इब्राहीम जदरानने २८ चेंडूंचा सामना करत ३८ धावांची खेळी केली. तर उमरजाईने २३ धावा केल्या. मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानकडून एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नव्हती. त्यामुळे अफगाणिस्तानचा संघ विजयापासून १०४ धावा दूर राहिला.

भारतीय संघाचा सुपर ८ मध्ये पहिला सामना अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. हे दोन्ही संघ २० जून रोजी आमनेसामने येणार आहेत.हा सामना बारबाडोसमध्ये पार पडणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com