VIDEO: 22 षटकार, १७ चौकार; १४० किलोच्या 'या' फलंदाजानं T20 मध्ये कुटल्या २०५ रन

वेस्टइंडीजचा अष्टपैलू रहकीम कॉर्नवाल यानं टी २० क्रिकेटमध्ये विस्फोटक खेळी केली.
Rahkeem Cornwall
Rahkeem Cornwallsaam tv
Published On

Rakheem Cornwall News : वेस्टइंडीजचा अष्टपैलू रहकीम कॉर्नवाल यानं टी २० क्रिकेटमध्ये विस्फोटक खेळी केली आहे. अमेरिकेतील लीगमध्ये त्यानं २०५ धावा कुटल्या आहेत. या खेळीत त्यानं तब्बल २२ षटकार आणि १७ चौकार ठोकले आहेत. वेस्टइंडीज (West Indies) कडून रहकीम कॉर्नवाल (Rahkeem Cornwall) यानं २०१९ मध्ये भारताविरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं.

त्यावेळी या कॉर्नवालच्या वजनाची चर्चा झाली होती. त्याचं वजन १४० किलो आणि त्याची ऊंची ६ फूट ६ इंच आहे. वेस्टइंडीजसाठी तो केवळ कसोटी खेळला आहे. वेस्टइंडीजमध्ये टी २० लीग आणि देशांतर्गत क्रिकेट खेळताना तो दिसला आहे. याच अष्टपैलू क्रिकेटरनं टी २० क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावलं आहे. (Latest Marathi News)

अमेरिकेत अटलांटा ओपन टी २० लीग होत आहे. या लीगमध्ये अटलांटा फायर आणि स्क्वार ड्राइव्ह टीम यांच्यात बुधवारी सामना खेळवला गेला. या सामन्यात अटलांटा फायरकडून खेळताना रहकीम कॉर्नवाल यानं द्विशतक ठोकलं. सलामीला उतरलेल्या कॉर्नवालने अवघ्या ७७ चेंडूंमध्ये २०५ धावा कुटल्या.

Rahkeem Cornwall
T20 Worls Cup: फ्लाईट मिस झाल्याने खेळाडू थेट संघाबाहेर; क्रिकेट बोर्डाचा कठोर निर्णय

या तुफानी खेळीत कॉर्नवालने १७ चौकार आणि २२ षटकार ठोकले. त्याने डावाच्या अखेरच्या चेंडूवर षटकार लगावून द्विशतक पूर्ण केलं. याआधी त्याने ४३ चेंडूंमध्ये शतक ठोकले होते. अटलांटा फायरने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत एक गडी बाद ३२६ धावा केल्या. रहकीम कॉर्नवाल याच्या व्यतिरिक्त स्टीव्हन टेलरने १८ चेंडूंमध्ये ५ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ५३ धावांची झंझावाती खेळी केली. तर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या समी असलम याने २९ चेंडूंत ५३ धावा केल्या.

Rahkeem Cornwall
India vs South Africa : मालिकेच्या अखेरच्या टी२० सामन्यात भारत पराभूत; दक्षिण आफ्रिकेने ४९ धावांनी जिंकला सामना

हे भलंमोठं आव्हान घेऊन मैदानात आलेल्या स्क्वायर ड्राइव्ह या संघाने २० षटकांत ८ गडी गमावून केवळ १५४ धावा केल्या. यशवंत बालाजी याने ३८ आणि वरुण साई मंथा याने ३६ धावा केल्या. रहकीम कॉर्नवाल यानं अलीकडेच आपण ३६० डीग्री क्रिकेटर असल्याचा दावा केला होता. तो हिटिंगची प्रॅक्टिस करत नाही, असंही तो म्हणाला होता. हा त्याचा नैसर्गिक खेळ आहे. आतापर्यंत त्याने ६६ टी २० सामने खेळले आहेत. यात त्याने १४७.४९ च्या स्ट्राइक रेटने ११४६ धावा केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com