Rohit sharma: हातात घड्याळ, पांढरा टी-शर्ट…! ऑस्ट्रेलियाच्या संसदेत रोहित शर्माची दिमाखात एन्ट्री, भाषणाने सर्वांची मनंही जिंकली

IND vs AUS 2nd Test: दुसऱ्या टेस्टपूर्वी टीम इंडियाने गुरुवारी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांची भेट घेतली. इतकंच नाही तर कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलियन संसदेत भाषण करत सर्वांचं मन जिंकून घेतलं.
Rohit Sharma impressive entry
Rohit Sharma impressive entrysaam tv
Published On

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळवण्यात येतेय. यामधील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला असून पुढची टेस्ट ६ डिसेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. दरम्यान या दुसऱ्या टेस्टपूर्वी टीम इंडियाने गुरुवारी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांची भेट घेतली. इतकंच नाही तर कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलियन संसदेत भाषण करत सर्वांचं मन जिंकून घेतलं.

Rohit Sharma impressive entry
Ajinkya Rahane: KKR ने 'या' तीन खेळाडूंची लाज वाचवली? अखेरच्या क्षणाला अजिंक्य रहाणेसोबत 'या' खेळाडूंना घेतलं ताफ्यात

यावेळी ऑस्ट्रेलियाच्या संसदेत रोहितने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मजबूत संबंधांचं कौतुक केलं आणि सध्या सुरु असलेल्या दौऱ्यात सिरीज जिंकण्याची गती कायम ठेवण्याचंही म्हटलंय.

Rohit Sharma impressive entry
Cricketer Retirement: बॉर्डर- गावसकर ट्रॉफी सुरु असताना टीम इंडियाला धक्का! विराटच्या खास खेळाडूचा क्रिकेटला रामराम

संसदेत काय म्हणाला रोहित शर्मा?

रोहित शर्माने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील संबंधांबाबत संसदेत बोलताना म्हटलं की, 'आपलं नातं फार जुनं आहे, मग ते खेळाचं असो किंवा व्यवसायाचं. गेल्या अनेक वर्षांपासून आपण क्रिकेट खेळण्यासाठी आणि देशातील विविध संस्कृतींचा आनंद घेण्यासाठी या भागात आलो आहोत. साहजिकच, ऑस्ट्रेलिया चॅलेंजिंग आहे. खेळाडूंनी या ठिकाणी येऊन क्रिकेट खेळणे आव्हानात्मक आहे कारण इथल्या लोकांमध्ये जोश आहे. त्यामुळे या येऊन क्रिकेट खेळणे हे आमच्यासाठी नेहमीच मोठे आव्हान असतं.

Rohit Sharma impressive entry
Cricketer Retirement: बॉर्डर- गावसकर ट्रॉफी सुरु असताना टीम इंडियाला धक्का! विराटच्या खास खेळाडूचा क्रिकेटला रामराम

सिरीज जिंकण्याबाबत काय म्हणाला रोहित?

तो म्हणाला, 'सुरु असलेल्या सिरीजमधील पहिल्या सामन्यात आम्हाला यश मिळालं आणि गेल्या ती गती कायम ठेवायची आहे. आम्हाला ऑस्ट्रेलियन संस्कृतीचा आनंद घ्यायचा आहे. शहरांची विविधता एक वेगळीच अनुभूती देते. या सिरीजच्या निमित्ताने येत्या काही आठवड्यांत ऑस्ट्रेलियन लोकांचं तसंच भारतीय चाहत्यांचं मनोरंजन आम्ही करू शकू अशी आशा आहे.

Rohit Sharma impressive entry
Cricketer Retirement: बॉर्डर- गावसकर ट्रॉफी सुरु असताना टीम इंडियाला धक्का! विराटच्या खास खेळाडूचा क्रिकेटला रामराम

चांगल्या कामगिरी आशा

6 डिसेंबरला होणाऱ्या पिंक बॉलच्या टेस्टपूर्वी रोहित म्हणाला, 'आम्ही क्रिकेट खेळण्यास उत्सुक आहोत आणि या देशाचा आनंदही लुटणार आहोत. हे एक अद्भुत ठिकाण आहे, याची सर्वांना कल्पना आहे. येत्या महिन्यात आमच्याकडून खूप चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद सर. ही आनंदाची बाब आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com